Ladki Bahin Yojana News: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता (February Month Installment) अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार? असा सवाल महिला विचारत आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जुलै - २०२४ पासून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत महिलांना सात हप्ते मिळाले आहेत. या हप्त्यापोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत प्रती लाभार्थी १०, ५०० रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत.
नव्या निकषानुसार, लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे आत्तापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता, आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती मिळाली आहे.
या महिन्याचे १ हजार ५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज ( २७ फेब्रुवारी) पासून जमा होण्याची शक्यता आहे, असे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नवे निकष लागू
* सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता नवे निकष लागू करण्यात येत आहेत.
* लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या. त्यांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात येत होते.
* मात्र मागील काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांना वगळून फक्त गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे.
* या पडताळणीनंतर आत्तापर्यंत एकूण ९ लाख बहिणी बाद झाल्या आहेत. वित्त विभागाकडून ३ कोटी रुपयांहून अधिक पैसे वर्ग करण्यात आले आहेत.
आज मिळणार हप्ता ?
जानेवारी महिन्याचे १५०० रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले होते. मात्र फेब्रुवारी महिना आता संपतही आला, आज २७ तारीख आहे, पण तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत. मात्र, आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊन त्यांना या महिन्याचे १ हजार ५०० रुपये मिळतील, अशी चर्चा आहे. (February Month Installment)
काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. त्यामुळे या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. (February Month Installment)
हे ही वाचा सविस्तर : Lakhpati Didi Scheme: राज्यात 'या' जिल्ह्यातील लखपती दीदींची सक्षम घोडदौड