शिवाजी कदमजालना : लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेस महिलांचा (Women) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता योजनेचा आढावा नव्यानेच स्थापन झालेल्या सरकारकडून घेण्यात येत आहे.
अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे.
दरम्यान छाननी सुरू होण्यापूर्वीच 'लाडकी बहिणी योजना नको ग बाई' म्हणत नाव वगळण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) बार उडवून दिला होता. यामुळे विविध जिल्ह्यांमधून ही योजनेसाठी लाखो अर्ज दाखल झाले आहे. योजनेचा खर्च बघता शासनाकडून योजनेच्या निधीची कात्री लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्यांना दीड हजार रुपयांचे महत्त्व कळते, ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. जी महिला इन्कमटॅक्स भरते, पगार उचलते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल त्यांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेतील त्रुटी काढणार
इन्कमटॅक्स भरणाऱ्या, पगार घेणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, ज्या खऱ्या गरजू महिला आहेत, त्यांच्यासाठीच ती योजना आहे आणि त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्या योजनेतील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्यावर असेल त्यांनी जसे पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर सवलतीच्या गॅस सिलिंडर घेणे बंद केले, तशाप्रकारे गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ३७०० कोटींचा चेक महिला बालविकास विभागाकडे दिला आहे. २६ जानेवारीपासून महिलांच्या खात्यावर पैसे पडतील, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
योजना नको म्हणणारे अर्ज
गेल्या काही दिवसांपासून आमच्या विभागाकडे लाडक्या बहीण योजनेतून नाव काढून टाकणाऱ्या महिलांचे अर्ज प्राप्त होत आहे. असे सुमारे १० ते १२ अर्ज आलेले आहेत. अर्जाची छाननी करण्याचे निर्देश वरिष्ठ खात्याकडून देण्यात आले आहेत. लवकरच छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. - कोमल कोरे, महिला व बाल कल्याण विकास अधिकारी, जालना.
जालना जिल्ह्यात ५ लाख लाभार्थी
जालना जिल्ह्यात एकूण ५ लाख ४२ हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे. जालना जिल्ह्यात जालना तालुक्यात सर्वाधिक १ लाख ३३ हजार ३१ एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर सर्वाधिक कमी जाफराबाद तालुक्यात ४४ हजार ९२० एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश
* लाडक्या बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. योजनेत दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे.
* यानुसार, जालना जिल्ह्यातील अर्जाची छाननी प्रक्रिया देखील येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तालुकानिहाय लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या
अंबड | ७३ हजार ४६५ |
बदनापूर | ४५ हजार १६७ |
जालना | १ लाख ३३ हजार ३१ |
भोकरदन | ८३ हजार ५१ |
जाफ्राबाद | ४४ हजार ९२० |
मंठा | ४५ हजार ८२१ |
परतूर | ५० हजार ५२९ |
घनसावंगी | ६३ हजार ३८१ |
हे ही वाचा सविस्तर : Us Galap Hangam : यंदा गाळप मुदतीच्या आतच; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर