Ladki Bahin Yojana New Update : राज्य सरकारने लाडक्या बहिण योजनेचाLadki Bahin Yojana डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा डिसेंबर महिन्याचा लाभ मिळणार मंगळवार (२४ डिसेंबर) पासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. यात सुरुवातीला ज्या बहिणींनी नव्याने अर्ज केला त्यांच्या खात्यातAccount ७,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली.
त्याच बरोबर बुधवार(२६ डिसेंबर) पासून या महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता बहिणींची संक्रांत गोड होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते.
दोन टप्प्यात पैसे
* सदरील योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.
* आता २५ डिसेंबरपासून चालू महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात झाली आहे.
एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत.
* काही महिलांच्या खात्यावर १५०० रुपये बुधवारपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या काही महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हे ही वाचा सविस्तर : Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; संक्रांत होणार दणक्यात साजरी वाचा सविस्तर