Lokmat Agro >शेतशिवार > Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: No money deposited in account; Follow these steps and see the name  | Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. तुमचे नाव यादीत आहे का ते एकदा चेक करा. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana)

आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. तुमचे नाव यादीत आहे का ते एकदा चेक करा. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana)

शेअर :

Join us
Join usNext

Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून शासनाकडून पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता जमा केला असून तिसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता जमा केला असून तिसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. 

पण काही महिलांच्या खात्यात अद्यापही ४ हजार ५०० रुपये जमा झाले नाहीत. तर काहींच्या खात्यात १ हजार ५०० रुपये जमा केले जात आहेत. त्यातच आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे.

या यादीत ज्या महिलांचे नाव आहे. त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पण या यादीत नावाची नोंद करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.

यादी चेक करण्यासाठी 'या' स्टेप्स करा

* लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

* प्रथम यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर जायचे आहे. 

* गुगलवर तुम्हाला उदा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका(कॉर्पोरेशन) असे  सर्च करायचे आहे. 

* त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पेज ओपन करायचे आहे.

* आता नवीन पेज उघडणार आहे. 

* माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी छत्रपती संभाजीनगर म्युनसिपल कॉर्पोरेशन असा पहिला पर्याय दिसेल. 

* या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 

* त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसणार आहे. 

* या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.   

* ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमचा ॲप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती आदींची माहिती मिळेल. 

* अशाप्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचे नाव तपासता येणार आहे. 

* जर या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

* याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे.

* सदर यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल अथवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. 

* जर तुम्हाला ऑनलाईन यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैसे जमा होण्याविषयीची माहिती मिळेल.  त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी एकदा नक्की चेक करा.

Web Title: Ladki Bahin Yojana: No money deposited in account; Follow these steps and see the name 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.