Lokmat Agro >शेतशिवार > ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ

ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ

ladki bahin yojana: Now these women will also get benefit from ladki bahin yojana | ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ

ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आलेले अर्ज सध्या जिल्हा पातळीवर मान्यतेसाठी आहेत. मात्र, अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावरून शंका व्यक्त केली जात होती.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आलेले अर्ज सध्या जिल्हा पातळीवर मान्यतेसाठी आहेत. मात्र, अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावरून शंका व्यक्त केली जात होती.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आलेले अर्ज सध्या जिल्हा पातळीवर मान्यतेसाठी आहेत. मात्र, अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावरून शंका व्यक्त केली जात होती.

शासकीय योजनांमधील लाभ दीड हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळणार असल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहे. हा लाभ दीड हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा, अशी चर्चा सध्या महिलांमध्ये आहे. मात्र, शासकीय योजनेचा लाभ दीड हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतूनही लाभ मिळणार असल्याचे राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात संजय गांधी निराधार योजनेतून महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपयांचा लाभ दिला जातो. त्यामुळे ज्या महिलांना हा लाभ मिळतो, त्यांना लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अन्य योजनांमधून त्यापेक्षा कमी लाभ असल्यास या योजनेत महिला सहभागी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

नवे संकेतस्थळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरिता www.ladkibahin.maharashtra. gov.in संकेतस्थळ आजपासून सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली. या योजनेकरिता यापूर्वी नारी शक्तीदूत अॅपवरून अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असेही त्या म्हणाल्या.

लाभार्थ्यांना अन्य योजनांमधून लाभ मिळतोय किंवा नाही याची पडताळणी तालुकास्तरीय तसेच वॉर्डस्तरीय समित्या करतील. जिल्हास्तरीय समिती त्याला मान्यता देईल. - डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास

Web Title: ladki bahin yojana: Now these women will also get benefit from ladki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.