Join us

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस मिळणार तरी कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 5:02 PM

राज्य शासनाने महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णयही घेतला. (Ladki Bahin yojana)

Ladki Bahin yojana :

नांदेड : राज्य शासनाने महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ पात्र बहिणींना वितरीत करण्यात आला.

यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णयही घेतला होता, मात्र सध्या तरी या योजनेचा लाभ महिलांना मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले मोफत गॅस सिलिंडरचे काय असा प्रश्न महिला उपस्थित करत आहेत.

मोफत गॅस सिलिंडर मिळणार या आशेने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी गॅस एजेंसी गाठत केवायसी करून घेतली. तसेच बँकांचे बंद पडलेले खाते देखील सुरू करून घेतले.

लाडक्या बहीण योजनेचे जसे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले तसे मोफत गॅस सिलिंडर योजनेचे देखील होतील, अशी अशा महिलांना लागली आहे.

लाडक्या बहिणीचे पाच लाख अर्ज पात्र

जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी तब्बल पाच लाख महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या पैकी बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे तीन हजार रूपये जमा करण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार

लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रूपये वितरीत करण्यात येत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

सिलिंडरची अंमलबजावणी कधी होणार?

* जिल्ह्यात जवळपास पाच लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.

* लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या एका कुटूंबातील महिलेला एका वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.

* ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात तत्काळ अंमलबजावणी झाली त्या प्रमाणे अन्नपूर्णा योजनेची होताना दिसून येत नाही.

* या योजनेची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असुन त्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

गॅस एजन्सीवर केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी

* जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या तीन मोफत गॅस सिलिंडरचा आपणालाही लाभ मिळावा यासाठी महिला केवायसी करून घेण्यासाठी गॅस एजन्सीवर गर्दी करीत आहेत.

* बहुतांश महिलांनी गॅससाठी लागणारी केवायसीची कामे पूर्ण करून घेतली आहेत. तर उर्वरित पात्र ठरणाऱ्या महिलांदेखील बँक आणि गॅससाठीची केवायसी करून घेत आहेत.

• अनेक महिलांना केवायसी करण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. रोजमजुरीची कामे सोडून महिला केवायसी करण्यासाठी जात आहेत.

वर्षाला तीन सिलिंडर

* मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत.

* प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.

* एका कुटुंबातून रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र राहील. हा लाभ केवळ १४.२. कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रलाडकी बहीण योजनेचासरकारी योजनामहिलामहाराष्ट्र