Lokmat Agro >शेतशिवार > Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : The date of the third installment of Ladki Bahin Yojana has been decided When will the installment be received? | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली कधी मिळणार हप्ता वाचा सविस्तर

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

काय आहे योजना वाचा सविस्तर
■ योजनेचे उदिदष्ट
१)  राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

■ योजनेचे स्वरुप
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम दिली जाईल.

■ योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

पात्रता
१) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२) राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
२) अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३) महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/१५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
४) वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक.
अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५) नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
६) बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७) लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो.

या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी
महिला हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१
तसेच आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Ladki Bahin Yojana : The date of the third installment of Ladki Bahin Yojana has been decided When will the installment be received?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.