Lokmat Agro >शेतशिवार > ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक

ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक

Ladki bahin yojna aadhar seeding : Ladki bahin yojna money deposited in which bank account? Check by entering Aadhaar number | ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक

ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक

लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक कोणत्या खात्यात आले आहे ते कसे चेक करा या विषयी वाचा सविस्तर (ladki bahin yojna aadhar seeding)

लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक कोणत्या खात्यात आले आहे ते कसे चेक करा या विषयी वाचा सविस्तर (ladki bahin yojna aadhar seeding)

शेअर :

Join us
Join usNext

ladki bahin yojna aadhar seeding : डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक खात्याला आधारकार्ड लिंक करता येते.

मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेचे आतापर्यंत पाच हफ्ते बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्याचे एकूण ७ हजार ५०० रुपये शासनाने बहिणींच्या खात्यात जमा केले आहे. पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याला आधारकार्ड लिंक करता येते. या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करण्यात आले आहे. मात्र योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होत आहेत, याविषयी संभ्रम अजुनही आहे. मात्र, तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही हे तपासू शकता.

डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. 

यासाठी कोणतेही बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे, तसेच बँक खाते सक्रीय आहे का, हे तुम्हाला तपासणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडे एकाहून अनेक खाती असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे, याबाबत संभ्रम आहे. मात्र डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याला आधारकार्ड लिंक करता येते.

आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते तपासण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे. 

आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते तपासा 
 
* सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

* यानंतर तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.

* आधार क्रमांक भरल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.

* आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत.

* नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा

* यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रीय आहे की नाही, हे सुद्ध समजेल. 

* तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.

* आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे आले आहेत.

Web Title: Ladki bahin yojna aadhar seeding : Ladki bahin yojna money deposited in which bank account? Check by entering Aadhaar number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.