जळगाव सुपे (ता. बारामती) येथे लक्ष्मी महिला बचतगटाच्या राजश्री खोमणे, सोनाली जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरड धान्य पोषण थाळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी नाचणीपासून शंकरपाळी, गुलाबजाम, वरी पुलाव, नाचणी मोदक, बाजरी खारवडे थालीपीठ, बाजरी लापशी व वरी आप्पे आदी रुचकर पदार्थ बनविले. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अॅग्रो स्टार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा पार जळगाव सुपे येथे पार पडली.
या स्पर्धेत गावातील १४ महिला बचतगटातील १९ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम पाच थाळीची निवड करण्यात आली. दुसरा क्रमांक स्वाती भापकर यांनी उत्तम चविष्ट ज्वारी चकली इतर नाचणी पदार्थ ठेवले होते. तिसरा क्रमांक विद्या जाधव यांना मिळाला. त्यांनी कोद्रा लाडू बनवले. चौथा क्रमांक शुभांगी थोरात यांना मिळाला. त्यांनी ज्वारी पासून उत्तप्पा, इडली बनवली. तर पाचवा क्रमांक सुनीता राठोड यांना मिळाला त्यांनी ज्वारी खाकरा बनवला. इतर महिलांनी ज्वारी आंबील, बाजरी कोथिंबीर वडी, बाजरी लापशी, सावा पुलाव, ज्वारी खाकरा, वरई उपमा आदी पदार्थ आणले.
यावेळी सरपंच कौशल्या खोमणे, ग्रामसेवक दीपाली हिरवे, मुनाबी मुजाबर, सुनील जगताप, योगेश खोमणे, डॉ. धीरज शिंदे, संतोष गोडसे, प्रियंका सातव जमदाडे व आकाश वळकुंदे आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील ग्रह विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शुभांगी तावरे व प्रा. मोनिका भोसले उपस्थित होते.