खामखेडा : परिसरात गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी रिमझिम झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खामखेडा परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
चालू वर्षी खामखेडा परिसरामध्ये सुरुवातीपासून पावसाची वक्रदृष्टी होती. सुरुवातीच्या नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर मका, बाजरी, भूईमग, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती.
गेल्या दीड महिन्यापासून पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. त्याची नजर चातक पक्षी सारखी आभाळाकडे लागली होती. परंतु गेल्याने चार-पाच दिवसांपूर्वी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळले असले तरी बळीराजाला अपेक्ष मोठ्या पावसाची आहे.
या रिमझिम पावसाने विहिरीच्या पातळीत वाढ होणार नाही. काही शेतकऱ्यांकडे महगडी से पोळ कांद्याचे बियाणे अजून घरामध्ये पडून आहे. आज दिवसेंदिवस उन्हाळी कांद्याचे भावात वाढ होत आहे.
पोळ कांदा लागवड होते ऑगस्टमध्ये- या दिवसांमध्ये पोळ कांद्याचे बियाणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टाकले जाते. म्हणजे पोळ कांद्याची लागवड साधारण ऑगस्ट पासून होत असते.- कांदा ऑक्टोबर महिन्यात तयार होऊन बाजारात येतो. ज्या शेतकऱ्यांकडे थोडे पाणी आहे. आशा शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे टाकली आहेत. अशी रोपे लागवडीसाठी आली आहेत.- परंतु अजूनही परिसरात जोरदार पाऊस होऊन नाल्यांना मोठ्या प्रमाण पाणी येऊन तलाव, बंधारे भरून वाहिले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने अजून विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे कांदा लागवड करता येत नाही.