Lokmat Agro >शेतशिवार > Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

Land Ceiling : 7 thousand acre land owners will get back the amendment order in the ceiling act | Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

तत्कालीन ब्रिटिश सरकारने नऊ गावांतील ७३७७ एकर जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती सुविधेसाठी फेरवितरण करण्याकरिता ३० वर्षांकरिता भूसंपादन कायद्याखाली ताब्यात घेतल्या होत्या.

तत्कालीन ब्रिटिश सरकारने नऊ गावांतील ७३७७ एकर जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती सुविधेसाठी फेरवितरण करण्याकरिता ३० वर्षांकरिता भूसंपादन कायद्याखाली ताब्यात घेतल्या होत्या.

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर मधील श्रीरामपूर तालुक्यातील 'आकारी पडीक जमीन' मूळ मालकांना परत करण्याकरिता 'सिलिंग कायद्यात' दुरुस्तीची अधिसूचना काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी बुधवारी राज्य शासनास दोन महिन्यांचा (६० दिवस) अवधी दिला.

या निर्णयामुळे नऊ गावांतील ७३७७ एकर जमीन मूळ मालकांना परत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने नऊ गावांतील ७३७७ एकर जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती सुविधेसाठी फेरवितरण करण्याकरिता ३० वर्षांकरिता भूसंपादन कायद्याखाली ताब्यात घेतल्या होत्या.

त्यानंतर २३ जुलै १९२०च्या करारनाम्यानुसार बेलापूर सिंडीकेट कंपनीकडे वर्ग केली. नऊ गावचे क्षेत्र व आकार कमी होऊन त्यांचे स्वतंत्र हरेगाव हे महसुली गाव तयार झाले. त्यांचे सर्व्हे नंबरचे विभाजन करून एबीसी ब्लॉकमध्ये रूपांतर केले.

तत्पूर्वी सदर जमिनीचे अधिकार अभिलेख हक्क नोंदणी रजिस्टरला मूळ मालकाचे नाव कमी होऊन सदर जमिनीस आकारी पडीक जमीन म्हणून नाव दाखल झाले. १९६५ला हरेगाव कारखान्याला 'जमीन धारणा कायदा' लागू झाला.

जादा जमीन (सरप्लस) सरकारने ताब्यात घेतली. १९७५ला राज्य शेती महामंडळ स्थापन झाले. त्यानंतर ती जमीन शासनाने परत घेण्याच्या अटीवर खंडाने (लीजवर) शेती महामंडळास दिली. तेव्हापासून ती महामंडळाच्याच ताब्यात आहे.

विविध याचिका
सदर जमीन मूळ मालकांना परत मिळावी, यासाठी वेळोवेळी विविध याचिका दाखल झाल्या. शासनाने निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. कायदेशीर अडचणीमुळे जमिनी परत करता येणार नसल्याचा निर्णय शासनाने ३० डिसेंबर २०१६ ला घेतला.

न्यायालयाने काय म्हटले आहे
• मूळ मालकांना जमीन परत देण्याबाबत राज्य शासनाने 'सिलिंग कायद्यातील' 'कलम २८-१एए मध्ये दुरुस्तीची तरतूद केली आहे.
• त्याअनुषंगाने पोट कलम ३ (१) (ब) चा समावेश करण्याची सुधारणा (दुरुस्ती) प्रस्तावित केली आहे, असे निवेदन अतिरिक्त सरकारी वकील सुभाष तांबे यांनी केले. उच्च न्यायालयाने शासनाचे हे म्हणणे रेकॉर्डवर घेऊन कायद्यात दुरुस्तीसाठी शासनास दोन महिन्यांचा अवधी दिला.
• परिणामी, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव, मुठे वाडगाव, माळवाडगाव, खानापूर, ब्राह्मणगाव, शिरजगाव, उंदीरगाव, निमगाव व खैरी या गावांतील ७३७७ एकर 'आकारी पडीक जमीन' मूळ मालकांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Web Title: Land Ceiling : 7 thousand acre land owners will get back the amendment order in the ceiling act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.