Join us

शेतकऱ्यांची जमीन हडपली; सावकारांची करा तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 9:23 AM

काही वर्षांआधी राज्य सरकारच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे सावकारांना परत करावी लागली होती. त्यावेळी सावकार मुद्दलीसह व्याजालाही मुकला होता. त्यानंतर सावकार कागदोपत्री सोने सरकारी दराने गहाण ठेवतो आणि जमिनीचे विक्रीपत्र करतो.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानंतरही काही राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज देत नाहीत, त्यामुळे बरेच शेतकरी सावकाराकडे जातात. अनेक जण सोने आणि शेती गहाण ठेवून पिकासाठी कर्ज घेतात. पिकाची अनिश्चितता बघता शेतकऱ्यांचे गहाण सोने आणि जमिनी सावकाराच्या घशात गेल्या आहेत.

काही वर्षांआधी राज्य सरकारच्या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे सावकारांना परत करावी लागली होती. त्यावेळी सावकार मुद्दलीसह व्याजालाही मुकला होता. त्यानंतर सावकार कागदोपत्री सोने सरकारी दराने गहाण ठेवतो आणि जमिनीचे विक्रीपत्र करतो. त्यामुळेच सहकार विभागाकडे तक्रारी येत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नागपूर जिल्ह्यात शेती हडपल्याची तक्रार नाहीनागपूर जिल्ह्यात सावकाराने मुद्दल आणि व्याजाच्या नावाखाली शेती हडपल्याच्या तक्रारीची नोंद सहकार विभागाकडे नाही. राज्य सरकारच्या कठोर कायद्यामुळे आता सावकारही शेतकऱ्यांची जमीन गहाण ठेवत नसल्याचे दिसून येते.

९ महिन्यांत ५ तक्रारीनागपूर जिल्ह्यात नऊ महिन्यांत पाच सावकारांवर तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत ठोस काहीच न सापडल्याने पुढील कारवाई झाली नाही. सावकारांची तक्रार करणारे पुढे येत नसल्याने सावकारावर कठोर कारवाई होत नसल्याचे सूत्रांचे मत आहे.

जिल्ह्यात अधिकृत १२१७ सावकारनागपूर जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत अधिकृत १२१७ सावकारांची नोंद आहे. १ एप्रिलपासून सावकाराचे नूतनीकरण आणि ३१ डिसेंबरपर्यंत नवीन परवाने काढले जातात. सावकारी व्यवसायाचा परवाना मिळविण्यासाठी सहकार विभागाने ऑनलाइन पद्धतीने अर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

सावकाराने सरकारच्या नियमानुसार कर्जावर योग्य व्याज आकारावे. याकरिता कायदेशीर परवाने घेणे आवश्यक आहे. जास्त व्याजदर आकारण्याची तक्रार आल्यास सावकाराची तपासणी आणि कठोर कारवाई करण्यात येते. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग

टॅग्स :शेतकरीनागपूरपैसासरकार