Lokmat Agro >शेतशिवार > Land Measurement : आता जमीन मोजणी ६ नव्हे ३ महिन्यातच होणार तर शुल्क देखील अधिक लागणार

Land Measurement : आता जमीन मोजणी ६ नव्हे ३ महिन्यातच होणार तर शुल्क देखील अधिक लागणार

Land Measurement: Now the land measurement will be done in 3 months instead of 6 and the fee will also be more | Land Measurement : आता जमीन मोजणी ६ नव्हे ३ महिन्यातच होणार तर शुल्क देखील अधिक लागणार

Land Measurement : आता जमीन मोजणी ६ नव्हे ३ महिन्यातच होणार तर शुल्क देखील अधिक लागणार

Land measurement : राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे. मात्र, मोजणीचा दर वाढविण्यात आला आहे.

Land measurement : राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे. मात्र, मोजणीचा दर वाढविण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे. मात्र, मोजणीचा दर वाढविण्यात आला आहे.

राज्यात आता नियमित आणि द्रुतगती, अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी होणार असून, ग्रामीण भागातील साध्या मोजणीसाठी पूर्वीच्या दरांमध्ये दुपटीने वाढ करून आता नियमित मोजणी करताना दोन हेक्टरसाठी आता दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर शहरी भागातील शेतजमिनींच्या मोजणीसाठी पूर्वी १० गुंठ्यांसाठी १ हजार द्यावे लागत होते. आता १ हेक्टर अर्थात १०० गुंठ्यांसाठी ३ हजार रुपये द्यावे लागतील.

ग्रामीणसाठी दरांत दुप्पट वाढ

■ ग्रामीण भागात साध्या मोजणीसाठी पूर्वी २ हेक्टरसाठी १ हजार रुपये द्यावे लागत होते.
■ आता मात्र, २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर त्यापुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी आणखी १ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
■ तर दुतगती मोजणी करताना २ हेक्टरसाठी ८ हजार रुपये व त्यापुढील २ हेक्टरसाठी ४ हजार रुपये मोजावे लागतील.

१४ वर्षांनंतर मोजणी दरात वाढ

● पूर्वीच्या दरांच्या तुलनेत सात हजारांची बचत होणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर मोजणीचे दर वाढविले असले तरी मोजणीचा कालावधी कमी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भूमिअभिलेख विभागाने दिले आहे. हे नवीन दर १ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

● पूर्वी साधी, तातडीची, अतितातडीची आणि अति अतितातडीची अशी चार प्रकारांत जमीन मोजणी केली जात होती. त्यामुळे मनुष्यबळ चार ठिकाणी विभागले जात होते. परिणामी मोजणीसाठीचा कालावधी १८० दिवसांचा ठेवण्यात आला होता.

● आता नियमित आणि द्रुतगती अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळ दोन ठिकाणीच विभागले जाईल. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया केवळ तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाणार आहे. या कालमर्यादमुळे अधिकाऱ्यांवरही मोजणीचे बंधन राहील. मोजणी वेळेत न झाल्यास संबंधितांवर सेवा हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार होते. परंतु, प्रशासकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, ती आता १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. मोजणीसाठीचा कालावधी कमी केल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल व अर्जाचा निपटारा जलदगतीने होईल. - कमलाकर हट्टेकर, उपसंचालक, भूमिअभिलेख, पुणे.

महापालिका क्षेत्रांमधील मोजणीसाठी ७ हजार रूपयांची अशी होणार बचत

● महापालिका तसेच नगरपालिका हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी पूर्वी १० गुंठ्क्यांसाठी १ हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता क्षेत्राची मर्यादा वाढवून ती १ हेक्टर अर्थात १०० गुंठे करण्यात आली असून, नियमित मोजणीचे दर मात्र ३ हजार करण्यात आले आहेत.

● याचाच अर्थ या भागातील मोजणीसाठी १०० गुंठ्यांसाठी पूर्वी १० हजार मोजावे लागत होते. आता त्यासाठी केवळ ३ हजार मोजावे लागणार आहेत. त्यात ७ हजार रुपयांची बचत होणार आहे. त्या पुढील प्रत्येक १ हेक्टरसाठी १ हजार ५०० रुपये द्यावे लागतील. द्रुतगती मोजणीसाठी १ हेक्टरला १२ हजार, तर त्यापुढील मोजणीसाठी ६ हजार द्यावे लागणार आहेत.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

Web Title: Land Measurement: Now the land measurement will be done in 3 months instead of 6 and the fee will also be more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.