land surveying : फार पूर्वी टिपण मोजणी करताना साखळीचा उपयोग व्हायचा. बेरार भागात विदर्भ प्रांत होता. त्यावेळी १६ आण्याची एक साखळी वापरण्याची पद्धत होती. त्याआधारे कच्चे टिपण करण्यात यायचे व हे टिपण प्रमाणात सोडविल्यानंतर त्याचे एकर व गुंठ्यामध्ये क्षेत्र काढण्यात येत असे. (land surveying)
त्यानंतर आता हेक्टर व आर असे ठरविण्यात आले आहे. भूमापन करण्याच्या पद्धतीमध्ये साखळी ते रोव्हर व ड्रोन असा कालानुरूप बदल झाल्याने आता 'घंटो का काम मिनिटों में' होत आहे. (land surveying)
या विभागाचे कामकाज कसे चाले, संगणकीय प्रक्रिया कशी असते, याची लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे या विभागाद्वारा सर्व तालुकास्तरावर या सर्व विषयांची माहिती देण्यात येऊन नागरिकांचे शंका निरसन करण्यात येणार आहे.
अमरावती जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख महेश शिंदे व उपसंचालक डॉ. लालसिंग मिसाळ यांच्या मार्गदर्शनात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
प्रत्येक मिळकतीचा नकाशा, पीआर कार्ड
* गावातील मिळकतीचे जीआयएस सर्वेक्षण व ड्रोनद्वारे गावठाण भूमापन स्वामित्व योजना अलीकडे अस्तित्वात आलेली आहे. याद्वारे मिळकतीचे, जमिनीचे सर्वेक्षण व भूमापन झालेले आहे.
* गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा व मालमत्तेची 'जीआयएस'बेस मिळकत पत्रिका तयार झालेली आहे.
आता अत्याधुनिक ड्रोनद्वारे होणार भूमापन
स्वामित्व योजनेअंतर्गत आता गावठाण हद्दीतील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे भूमापन करण्यात येत आहे. मिळकतीचे नकाशे व मिळकत पत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे हद्दीवरून होणारे वाद कमी होतील. मालमत्तेचे अभिलेख झाल्याने नागरिकांची आर्थिक पत सुधारेल.
'भूमापन दिना' निमित्ताने ९ एप्रिल रोजी भूमिअभिलेख कार्यालयात या विभागाचे कामकाज व सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात येणार व नागरिकांचे शंका-निरसन करण्यात येईल. - महेश शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: अवकाळीची धाकधुक कायम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर