Join us

जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 12:13 PM

राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२४ चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्याथ्यर्थ्यांना ही शेवटची संधी आहे; परंतु केवळ २०५ जागांसाठी ही परीक्षा होत असल्याने लाखो विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दीपक भातुसेमुंबई : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२४ चे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्याथ्यर्थ्यांना ही शेवटची संधी आहे; परंतु केवळ २०५ जागांसाठी ही परीक्षा होत असल्याने लाखो विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

एमपीएससीने तीन विभागांच्या परीक्षा जाहीर केल्या असून ५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. २५ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे, तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत मुदत आहे. 

केवळ २०५ जागांमुळे नाराजी- नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.- नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्ती जास्त जागांची परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती.- मात्र, २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

महत्त्वाच्या पदांचा समावेशच नाही; ३२ संवर्गापैकी केवळ १२- एमपीएससी ३२ संवर्गासाठी परीक्षा घेत असते. शुक्रवारी जाहीर झालेल्या जाहिरातीत केवळ १२ संवर्गातील पदाचा समावेश आहे.- मात्र, एमपीएसीचे विद्यार्थी ज्या पदांचे स्वप्न उराशी बाळगून परीक्षेची तयार करत असतात, त्या उप जिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या महत्त्वाच्या पदांचा यात समावेश नसल्यानेही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.- एमपीएससीने जागा वाढवून या महत्त्वाच्या पदांचा जाहिरातीत समावेश करावा किंवा लवकर नव्याने जाहिरात काढावी, अशी परीक्षार्थी लाखो विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.

असे आहे वेळापत्रकराज्यसेवा : सामान्य प्रशासन विभाग (पदे २०५) परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा : मृद व जलसंधारण विभाग (पदे २६) २३ नोव्हेंबर २०२४राज्य वनसेवा : महसूल व वनविभाग (पदे ४३) २८ ते ३१ डिसेंबर २०२४

जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटीची संधी आहे. त्यामुळे एमपीएससी आणि सरकारने याचा विचार करून दोन हजारांपेक्षा जास्त जागा वाढ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. - महेश घरबुडे, कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

टॅग्स :एमपीएससी परीक्षाविद्यार्थीराज्य सरकारसरकारपरीक्षा