Lokmat Agro >शेतशिवार > ई-केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, 'ही' आहे मुदत...  

ई-केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, 'ही' आहे मुदत...  

Last chance to do e-KYC, 'this' is the deadline... | ई-केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, 'ही' आहे मुदत...  

ई-केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, 'ही' आहे मुदत...  

ई-केवायसी करणे बंधनकारक 

ई-केवायसी करणे बंधनकारक 

शेअर :

Join us
Join usNext

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये रकमेचा लाभ देण्यात येतो. यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत ई- केवायसी करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे तसेच भूमी अभिलेख नोंदीनुसार माहिती अद्ययावत करून लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे, बँक घ्यावी, असे आवाहन हिंगोली  तालुका कृषी खात्याला आधार संलग्न करणे व भूमी अधिकारी कमलाकर सांगळे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास वर्षाला आधार संलग्न करण्यासाठी एक सहा हजार रुपये रकमेचा लाभ देण्यात येतो.  योजनेचा लाभ घेण्यासाठी ई- केवायसी करणे, बँक खात्याला आधार संलग्न करणे तसेच भूमी अभिलेख नोंदीनुसार माहिती अद्ययावत करणे बंधनकारक केलेले आहे. परंतु हिंगोली तालुक्यातील 3 हजार ९२१ लाभार्थ्यांनी अद्याप ई- केवायसी केलेली नाही. १ हजार १४६ लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार संलग्न केले नाही. या अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करण्यासाठी २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. यानंतर ई- केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न न केलेले लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यापासून अपात्र होणार आहेत. लाभार्थ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कमलाकर सांगळे यांनी केले आहे.

Web Title: Last chance to do e-KYC, 'this' is the deadline...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.