नैसर्गिक आपत्ती व पीकविमा भरपाई यात महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून, शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी गरजेची आहे. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी चौगुले यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.