नाशिक : कृषी विभाग (Agriculture News) व 'स्कायमेट 'च्या (Skymet) संलग्नतेने काही वर्षांपूर्वी स्वयंचलित हवामान केंद्राचा (Climate Center) 'महावेध' प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचा उपयोग पावसाळ्यात (Rain) चांगल्या पद्धतीने होत आहे. मात्र, प्रत्येक मोठ्या गावात ते नसून जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात ते आहे. जिल्ह्यात गावे १२००च्या वर असली तरी केवळ १२१ पर्जन्यमापक आहेत. ते सध्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत.
'स्कायमेट' संस्था काय करते?स्कायमेट ही हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची चर्चा होत असते. स्कायमेट या संस्थेच्या हवामानाचा अंदाज संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला असतो. स्कायमेट काही स्वयंसेवी संस्थांसह भारतातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह सुधारण्यासाठी काम करत आहेत.
यासाठी हवे पर्जन्यमापकपावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक (rain Gauge) यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रतिचौरस मीटर किंवा मिलिमीटर यावरून पाऊस मोजला जातो. त्यात मिलिमीटर व इंच परिमाण वापरले जाते. ठरावीक वेळेत झालेली पर्जन्यवृष्टी मोजण्यासाठी पर्जन्यमापक एक हवामानशास्त्रीय साधन आहे. शेतकरी अनेकदा आपल्या भागात पाऊस होणार आहे की नाही याची माहिती घेत असतात त्यानंतरच पिक लागवड करत असतात. परंतू पर्जन्यमापक या साधनाच्या आधारे त्यांना पिक लागवडीसाठी निर्णय घेता येतो. त्यामुळे या यंत्राला आगामी काळात महत्व प्राप्त झाले आहे.
पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीचपारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीच मिळत असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा अत्याधुनिक पद्धतीच्या स्वयंचलित पर्जन्यमापकाचा उपयोग चांगला होऊ शकतो. मात्र, शासनाकडे निधीचा ठणठणाठ असतो. त्यामुळे सध्या तरी पारंपरिक पर्जन्यमापकावरच अवलंबून राहावे लागत आहे.
स्वयंचलित यंत्रणा असे करते कामस्वयंचलित उपकरण असून, याद्वारे किती पाऊस पडला, याच्या नोंदी घेतल्या जातात. यातही पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते. पावसाच्या थेंबांची संख्या आणि आकार अचूकपणे मोजण्यासाठी डिजिटल सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि नंतर हा डेटा प्रक्रिया आणि संचयनासाठी डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करतात.
सातपूरला जागेची अडचणनाशिक जिल्ह्यात १२१ पर्जन्यमापक बसविले असून, त्यात अजून वाढीसाठी जिल्हा कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सातपूर येथेही अत्याधुनिक पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहे. जागेचा शोध सुरू आहे.
'महावेध' प्रकल्प काय?महावेध प्रकल्पांतर्गत सर्वसाधारण प्रदेशामध्ये १२४१२ किमी अंतरावर आणि डोंगराळ प्रदेशामध्ये ५४५ किमी अंतरावर एका स्वयंचलित केंद्राची एका स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. सर्व हवामान केंद्रांची देखभाल व दुरुस्ती आणि नादुरुस्त अथवा चोरी झालेल्या उपकरणांची बदली करावयाची जबाबदारी त्यात आहे.