नाशिक : आज प्रत्येक जण शेतकरी कुटुंबातला असून काही ना काही शेती केली जात आहे. हेच शेतकरी, प्रेक्षक वर्ग असल्याने, म्हणून तुम्ही आम्ही आहोत. अवघ्या जगाचा उदरनिर्वाह शेती माध्यमातून होत आहे, याच सर्व श्रेय शेतकऱ्याचा असून वेळोवेळी त्यांचं ऋण व्यक्त करणे गरजचे असल्याचे मत अभिनेते निलेश साबळे यांनी व्यक्त केले. ते नाशिक येथील जागतिक कृषी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्या माध्यमातून 13 व्या जागतिक जागतिक कृषी महोत्सवाला सुरवात झाली. कृषी महोत्सवाचे आकर्षण असलेल्या ग्रंथदिंडीत अनेकांनी सहभाग घेतला. कृषी दिंडीत शेती अवजारे, पर्यावरण पूरक रथ रचना, गोपालन प्रदर्शन, विविध शेती विषयक दिंड्या आदींचा समावेश होता. ५ ते ६ दरम्यान कृषी उद्योजकता युवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच कृषी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी उपस्थित असलेले कृषी महासंचालक मोहन वाघ म्हणाले की, सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व शासन यांच्यामार्फत सेंद्रिय शेती गतिमान होत आहे भावी पिढी मानसिक दृष्ट्या आरोग्य दृश्य सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी सेंद्रिय शेती समजावून घेऊन त्याची कास धरण्याचा आवाहन यावेळी त्यांनी केले.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे म्हणाले की, उत्तम शेती करायची असेल तर तंत्रज्ञान समजून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे मेळावे व चर्चासत्रे अशा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून घडवून आणली पाहिजे. जेणेकरून एकमेकांना वेगवगेळ्या प्रकारची शेती समजण्यास मदत होईल. याचद्वारे शेती विकसित होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. तर कृषी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले अभिनेते निलेश साबळे म्हणाले कि, जगाचा पोशिंदा म्हणून आज शेतकऱ्याची ओळख आहे, हा शेतकरी जपला तरच शेती जपली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वेगवगेळ्या स्टॉलचे प्रदर्शन
या जागतिक कृषी महोत्सवात अनेक शेती पूरक स्टाल लावण्यात आले आहेत. यात भारतीय शेती, दुर्मिळ वनोषधी, अत्याधुनिक शेती ज्ञान, तंत्रज्ञान, स्वयंरोजगार, शेतकरी वधुवर परिचय, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, आरोग्य व व्यसनमुक्ती, गावरान बी बियाणं, प्राचीन भारतीय कृषी विज्ञान, बारा बलुतेदार गाव, कृषी प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी व खाद्य संस्कृती असे विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन करणारे विभाग पाहायला मिळत आहेत.
तसेच दुग्धव्यवसाय व स्वयंरोजगार अंतर्गत रोजगाराची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे.