मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये 400 कोटी रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधी अंतर्गत सुक्ष्म सिंचन केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत - प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान देण्यात येणार आहे. यात ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी 300 कार्यक्रम मंजूर करण्यात आले आहेत. तर 100 वैयक्तिक शेततळे असे एकूण 400 मंजूर कार्यक्रम आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दि.१९ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दि. १८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.
या योजनेंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू- धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५ टक्के अनुदान देण्यात येते. सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय "मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन" योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८० टक्के व ७५ टक्के एकूण अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे दि. २९ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.
शासन निर्णयाद्वारे सूचना
या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करावी. या योजनेंतर्गत वितरीत निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करावे,