Join us

Agriculture News : स्वातंत्र्यदिनी 55 हजार शेतकरी करणार नादारीची घोषणा, जाणून घ्या सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 3:20 PM

Agriculture News : गावोगावी आपल्या गावाच्या वेशी जवळ किंवा चावडीवर येऊन आपली स्वतःची नादारी घोषित करणार आहे. 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम जिल्हा बँकेकडून (District Bank) सुरु आहे. या विरोधात तब्बल एक वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणूनच येत्या 15 ऑगस्ट रोजी सर्वच 55 हजार शेतकरी गावोगावी आपल्या गावाच्या वेशी जवळ किंवा चावडीवर येऊन आपली स्वतःची नादारी घोषित करणार आहे. 

भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. देशाची पूर्ण अर्थव्यवस्था शेती उद्योगावर अवलंबून आहे. परंतु केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे भारतीय शेती उद्योग पूर्ण तोट्यात गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. दुसरीकडे नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या व लीलावाच्या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात एक जूनपासून 55 हजार शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्काच्या जमिनीवर 101 ची 107 ची व 100 / 85  'र' प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांच्या जमिनी विकास सोसायटीच्या नावे करण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे.        दरम्यान एक वर्ष एक महिना (406) दिवस पूर्ण होऊन गेले तरी शासन दरबारी या आंदोलनाची दखल घेतली गेलेले नाही. दखल न घेतल्यामुळे 55 हजार शेतकरी गावोगावी आपल्या गावाच्या वेशी जवळ किंवा चावडीवर येऊन आपली स्वतःची नादारी घोषित करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील 55 हजार शेतकरी आंम्ही नादार झालो. अशी जाहीर घोषणा कर्जमुक्ती धरणे आंदोलन स्थळी केली जाणार आहे. म्हणजेच आम्ही आता कर्जमुक्त झालो अशी नादारीची घोषणा करणार आहोत असेही बोराडे यांनी स्पष्ट सांगितले.   

नादारीची घोषणा करणे म्हणजे नेमकं काय? 

एखादी कंपनी नफा नसल्या कारणाने किंवा सततच्या नुकसानीमुळे तोट्यात जाते. कंपनी चालवण्यासाठी पुरेसा पैसा देखील शिल्लक नसते. अशावेळी संबंधित कंपनी दिवाळखोरीत निघते, तसेच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, तर कधी शेतमालाला बाजारभावचं नाही. अशामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागतंय. त्यामुळे सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांकडे पैसाच शिल्लक नसल्याने शेतकरी दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. म्हणून नादाराची घोषणा केल्याचे शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकशेतकरी आंदोलनआंदोलन