Join us

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागात एकाच महिन्यात 59 रेक मक्याची वाहतूक, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:30 IST

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

जळगाव :भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. यात मका लोडिंगमध्ये (Maize Transport) विक्रमी कामगिरी केली असून ५९ रेक मका लोड करण्यात आला असून विभागाचा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

यामुळे विभागाला ३० कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून महसुली उत्पन्न १४८ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. भुसावळ रेल्वे विभागाने डिसेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करून मागील वर्षाच्या तुलनेत १२.८४ टक्के अधिक आहे.

यात माल वाहतूक उत्पन्नात मागील वर्षांपेक्षा ४८ टक्के जास्त उत्पन्न डिसेंबर महिन्यात मिळाले आहे. तसेच प्रवाशी वाहतूकीतुन देखील चांगले उत्पन्न मिळाले आहे. 

या स्टेशनवरून मका लोड मका लोडिंगमध्ये विक्रमी कामगिरी डिसेंबर २०२४ मध्ये ५९ रेक मका लोड होऊन ३० कोटी १९ लाखाचे महसूल मिळाले आहे. मनमाड, लासलगाव, नांदगाव, पाचोरा, जळगाव, खंडवा, अकोला-किल्ला, मलकापूर, खामगाव आणि भुसावळ स्थान- कावरून मकाचे रॅक लोड झाले आहे.

टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतीभुसावळ