Lokmat Agro >शेतशिवार > Aadhar Update : आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत आधार अपडेट करता येईल! 

Aadhar Update : आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत आधार अपडेट करता येईल! 

Latest News Aadhar Update Aadhar Card Update Deadline Extended Till 14 dec 2024 Date see details | Aadhar Update : आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत आधार अपडेट करता येईल! 

Aadhar Update : आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत आधार अपडेट करता येईल! 

Aadhar Update : ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

Aadhar Update : ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Aadhar Update : आपल्या दैनंदिन आयुष्यात आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्वाचा घटक बनले आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी  आधार अपडेट (Aadhar Update) असणे आवश्यक असते. आता ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवून 14 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आली आहे. 

लहानांपासून ते जेष्ठापर्यंत आधार कार्ड (Aadhar Card Update Date Extended) ओळख बनली आहे. कोणतेही शासकीय करताना आधार कार्ड दाखवावे लागते. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असते. यात व्यक्तीच्या नावापासून जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि महत्वाचे म्हणजे संपूर्ण पत्ता असतो. यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविली जाते. मात्र अनेकदा नावात बदल, मोबाईल नंबर बदलण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी आधार अपडेट करावे लागते. यासाठी १४ सप्टेंबर पर्यंत मुदत  होती,यात वाढ करण्यात आली आहे. 

याबाबत UIDAI ने ट्विटरवर अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. ही आधार अपडेट करण्याची सेवा मोफत असून 14 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मोफत सेवा माय आधार या वेबपोर्टलवर मिळणार आहे. तुम्ही तुमचा पत्ता आणि कागदपत्रे  केवळ ऑनलाइन साइटद्वारे अपडेट करू शकता. उर्वरित अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे. 

आधार अपडेट गरजेचे 

आधार अपडेट करणे आवश्यक आहे, कारण जर आधार कार्ड जुने असेल तर पत्ता, मोबाईल नंबर बदलला असेल तर अपडेट करणे फायदेशीर ठरू शकते. जर तुमच्या आधारमध्ये जुना पत्ता किंवा नंबर असल्यास ते अपडेट करणे आवश्यक आहे. काहीवेळा आधार लिंक मोबाईल नंबर बंद असल्यास बँकेत व्यवहार करण्यास अडचण येऊ शकते. शिवाय शासकायय योजनांचा लाभ घेण्यास अडचणीचे ठरू शकते. 

Web Title: Latest News Aadhar Update Aadhar Card Update Deadline Extended Till 14 dec 2024 Date see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.