Aple Sarkar Portal : आपले सरकार पोर्टलच्या (Aple Sarkar Portal) संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात. या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत.
या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती आहे अर्थात मेंटेनन्स (Portal Maintanace) आहे हे मेंटेनन्स पूर्ण केलं जाणार आहे आणि यामुळे दहा एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान या पाच दिवसांच्या कालावधी दरम्यान कालावधीसाठी आपले सरकार पोर्टल अंडर मेन्टेनन्स असणार आहे. अर्थात या कालावधीमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व सेवा सुविधा या बंद असणार आहेत.
दरम्यान 10 एप्रिल ला महावीर जयंती, 11 एप्रिलला चालू दिवस आहे अर्थात सुट्टी वगळता दिवस आहे. 12 एप्रिलला हनुमान जयंती, 13 एप्रिलला रविवार आहे, आणि 14 एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती अशा चार सुट्ट्या आणि एक सुट्टी विदाऊट सुट्टीचा दिवस अशा पाच दिवसांसाठी हे आपले सरकार पोर्टल आता पूर्णपणे बंद असणार आहे.
महत्वाचे म्हणजे नागरिकांपर्यंत मेसेज पोहोचला नाही तर सेवा सुविधा घेणारे नागरिक किंवा शेतकरी आहेत, ते या कालावधीमध्ये कामासाठी हेलपाटे मारू शकतात. यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आयटी विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाडीजीआयपीआर या एक्स हॅण्डलवर देखील याबाबतची अपडेट देण्यात आलेली आहे.