Join us

Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 7:53 PM

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात होणार आहे. 

त्र्यंबकेश्वर : दरवर्षाप्रमाणे आषाढीवारी, पंढरपूर यात्रा सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा पायी दिंडी पालखी रथसोहळा पंढरपूरकडे प्रयाण करीत असतो. पंढरपूर यात्रा देवशयनी एकादशी आषाढ शु.॥ 11 अर्थात 17 जुलै 2024 रोजी असल्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात होणार आहे. 

संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीच्या वाटेवरील गावोगावचे लोक सहभागी होत असतात. निवृत्तीनाथ दिंडी पंढरपूरपर्यंत ५० ते ६० हजार भाविक वारकरी सहभागी होत असतात. या पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी भाविकांसह आपण सर्वांनी या प्रस्थानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने निवृत्तीनाथ संस्थांनतर्फे दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध करावयाचे पालखी सोहळा पत्रक मखमलाबाद येथे श्रीराम मंदिरामध्ये भजनी मंडळ व ग्रामस्थ व वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आलो आहे. पायी पालखी दिंडी सोहळ्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी विश्वस्त प्रा. अमर ठोंबरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

असा असणार प्रवास

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा पायी दिंडी सोहळ्याचा प्रवास २९ दिवसांचा असून, तीन दिवस मुक्काम करून २१ जुलै रोजी पंढरपूरहून परतीचा प्रवास नेहमीच्या मार्गाने करून १८ व्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे दिंडीचे आगमन होणार आहे.

टॅग्स :नाशिकपंढरपूरआषाढी एकादशीत्र्यंबकेश्वरशेती