Agri Education : भारताला कृषी प्रधान (Agriculture News) देश म्ह्णून ओळखले जाते. अलीकडच्या काळात शेतीच्या आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात भरीस भर म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद, जागतिक बँकेच्या सहाय्याने, कुशल शेती व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करण्यासाठी कृषी शिक्षणात सुधारणा करत आहे. या व्यावसायिकांनी पुढील हरितक्रांतीचे नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ज्यामुळे शेती अधिक उत्पादक, फायदेशीर ठरण्यास मदत होईल.
भारताच्या कृषी क्षेत्रात (Indian Agriculture) आमूलाग्र बदल बदल होत आहेत. सेंद्रिय शेतीसह आधुनिक तंत्रज्ञानाची शेती होऊ लागली आहे. यात शेतकरी सुद्धा मागे नसून अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर 77 कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात जागतिक दर्जा पूर्ण करण्यासाठी लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आता अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण घेत असून यात GPS, ड्रोन, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचे शिक्षण घेत आहेत.
दरम्यान अशा विविध विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत. हेच शिक्षण घेऊन पुढील काही वर्षात देशात कृषी क्रांती घडवली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना सर्वोच्च राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षकांकडून शिकण्याची आणि परदेशात अभ्यास करण्याची संधी देते. 2017 आणि 2024 दरम्यान, जागतिक बँकेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाने कृषी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेला पाठिंबा दिला. 77 कृषी विद्यापीठांमध्ये 5 लाख 14 हजारा हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
कृषी शिक्षणासाठी संख्या वाढली
तसेच वर्षभरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 25 हजारावरून 64 पर्यंत झाली आहे. त्यापैकी 45 टक्के मुली होत्या. या प्रकल्पाने उद्योजक घडवण्याचे काम केले आहे. तसेच 500 हून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या. ज्याची वार्षिक सरासरी उलाढाल 92 लाख रुपये आहे. या प्रगतीसह, भारतातील सुधारित कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी ग्रामीण भारताचा कायापालट करण्यासाठी आणि भविष्यात देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहेत, हे यावरून दिसते.