Lokmat Agro >शेतशिवार > Farmer ID : शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी संबंधित 10 प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी संबंधित 10 प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Latest News Agri stack Read answers to 10 questions related to Farmer ID card one click, see details | Farmer ID : शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी संबंधित 10 प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी संबंधित 10 प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Farmer ID : शेतकरी ओळखपत्राशिवाय, शेतकरी शेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत.

Farmer ID : शेतकरी ओळखपत्राशिवाय, शेतकरी शेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत.

शेअर :

Join us
Join usNext

Farmer ID : आता सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. भविष्यात, शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच त्यांना पीएम-किसान, पीक विमा आणि इतर तत्सम सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. 

शेतकरी ओळखपत्राशिवाय, शेतकरीशेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी ओळखपत्राशी संबंधित अनेक प्रश्न सुरू आहेत. नेमका शेतकरी ओळखपत्र (Shtekari Olakhpatra) किंवा फार्मर आयडी काय आहे? का आवश्यक आहे? आणि कुठे बनवून मिळेल, यासह इतर प्रश्नांची उत्तरे या लेखाद्वारे पाहुयात... 

१. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
यास शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी असेही म्हणतात. ही एक डिजिटल ओळख आहे, जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदींशी म्हणजेच जमिनीच्या तपशीलांशी जोडते. सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

२. शेतकरी नोंदणी म्हणजे काय?
शेतकरी नोंदणी ही एक अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती नोंदवली जाते. कृषी योजनांमध्ये आणखी सुधारणा करण्याचा हा एक प्रयत्न आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, शेतकऱ्यांच्या शेतकरी आयडीचा संपूर्ण डेटाबेस म्हणजे शेतकरी नोंदणी.

३. मग शेतकरी ओळखपत्राची गरज काय?
शेतकरी आयडीवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित होणार आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे मिळण्यास सोपे होईल. शेतकरी आयडी तयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि यामुळे योजनांमधील भ्रष्टाचारापासूनही मुक्तता मिळेल.

४. सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र घ्यावे लागेल का?
हो. आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे, तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

५. शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे
सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या https://hrfr.agristack.gov.in/ या संकेतस्थळावर फार्मर आयडी बनवले जात आहेत. याशिवाय, राज्य सरकारे वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहिमा राबवत आहेत. शेतकरी पंचायत स्तरावर शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी देखील मदत घेऊ शकतात.

६. या कार्डचे काय होईल?
शेतकऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल. यामुळे सरकारला शेतकऱ्याची जमीन, त्याचे पशुधन आणि त्याने घेतलेल्या पिकांची माहिती मिळेल.

७. कोणत्या राज्यात शेतकरी ओळखपत्र लागू होईल?
आतापर्यंत १९ राज्ये या उपक्रमात केंद्र सरकारसोबत सहभागी झाली आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू झाले आहे. याशिवाय, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये सध्या फील्ड चाचण्या सुरू आहेत, तर उर्वरित राज्यांमध्ये ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहे.

८. शेतकरी नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
आधार कार्ड
आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर
खसरा-खतौनीची प्रत
शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्याने स्वतः उपस्थित राहणे देखील आवश्यक आहे.

९. शेतकरी आयडीचा काय फायदा होईल?
शेतकरी नोंदणीतून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. यानंतर, वारंवार ई-केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोणत्याही कागदपत्राशिवाय डिजिटल केसीसीद्वारे बँकेकडून जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. सर्व योजनांमध्ये पारदर्शक पद्धतीने अनुदानाचा लाभ उपलब्ध असेल. शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विमा भरपाई मिळणे सोपे होईल.

१०. तुम्ही कोणत्या पोर्टलवर अर्ज करू शकता
प्रत्येक राज्य सरकारचे स्वतंत्र पोर्टल या योजनेसाठी काम करत आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी agristack या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन केले आहे. 

Web Title: Latest News Agri stack Read answers to 10 questions related to Farmer ID card one click, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.