Join us

कृषि सल्ला : द्राक्षांवरील लाल कोळी, डाळिंबाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, कांद्यावरील करपा रोगासाठी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 12:39 PM

मार्च महिन्यात द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, हे कृषि सल्ल्यातून जाणून घेऊयात..

सद्यस्थितीत वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने अनेक पिकांना फटका बसतो आहे. द्राक्ष बागा काढणीला आलेल्या आहेत, उन्हाळ कांदा ऐन भरात आहे, तर डाळींबाचा हस्त बहार साठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विषय विशेषज्ञ पवन चौधरी यांनी याबाबत कृषी सल्ला दिला आहे. 

द्राक्ष -

बहुतेक द्राक्ष क्षेत्रांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास सल्फर ८० डब्लू.डी.जी. ०.७५ मिली किंवा अॅबेमेक्टीना @ १.५ ते २ यें/ली (पी. एच. आय. ३० दिवस) किंवा बायफेनाझेट २२.६ एस.सी. ०.५ मिली/ली (पी. एच. आय. ३० दिवस) पाण्यात फवारणी करावी.

डाळिंब- हस्त बहार (ऑगस्ट-सप्टेंबर)

फळांच्या चांगल्या गुणवतेसाठी आणि फळांचा आकार वाढविण्यासाठी ०:५२:३४१ ते ६ गॅली या प्रमाणात १५ ते २० दिवसाच्या अंतराने पानांवरती ३ फवारण्या घ्याव्यात. तसेच १० ते १५ दिवसांच्या अंतराने मॅगनीज सल्फेट @ ६ रॉली पाणी या प्रमाणात दोन फवारण्या घ्याव्यात. कोळी किटकाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात दिसून आल्यास निबोळी तेल १% (१०००० पी.पी.एम.) @ 3 मिली / ली पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी, प्रादुर्भाव वाढल्यास पेनाझाक्विन १०% ई सी @ १.५ मिली/ली किंवा फेनपायरॉक्सीमेंट ५ % ई सी ०.५ मिली/ ली. या प्रमाणात फवारणी घ्यावी

कांदा

कांदा पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल नियंत्रणासाठी कार्याल्पा २ मिली किंवा फिप्रोनीत मिली/ली पाणी या प्रमाणात तसेच फुल किडीच्या मिली/ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी काटा जागवडीच्या ८० दिवसानंतर १३:०१४५५ली पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीपीक कर्जपीक व्यवस्थापनद्राक्षेकांदा