Lokmat Agro >शेतशिवार > कृषी विभागाचा कृषी महोत्सव 10 फेब्रुवारीपासून, काय-काय असणार?                                                                  

कृषी विभागाचा कृषी महोत्सव 10 फेब्रुवारीपासून, काय-काय असणार?                                                                  

Latest News Agriculture Department's Agricultural Festival from February 10 in nashik | कृषी विभागाचा कृषी महोत्सव 10 फेब्रुवारीपासून, काय-काय असणार?                                                                  

कृषी विभागाचा कृषी महोत्सव 10 फेब्रुवारीपासून, काय-काय असणार?                                                                  

नाशिक कृषि विभागाच्या माध्यमातून येत्या 10 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक कृषि विभागाच्या माध्यमातून येत्या 10 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवास प्रवेश विनामुल्य असून शेतकरी व नागरिक यांनी या कृषि महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नाशिक राजेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

नाशिकमध्ये गेली अनेक वर्षांपासून कृषी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून यंदाही कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कृषि विभाग व इतर सलग्न विभागाच्या शासकीय येाजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय दालने, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रिय शेतमाल विक्री, आधुनिक शेती औजारांचे प्रदर्शन तसेच गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचतगट यांच्यामार्फत उत्पादित केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण खाद्य संस्कृती दर्शविणारे विक्रीचे स्टॉल्स सुद्धा प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

तसेच या पाच दिवसीय आयोजित कृषि महोत्सवात दोनशे पेक्षा अधिक स्टॉल्स् असणार आहेत. आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर  परिसंवादाचे आयोजनही कृषि महोत्सवात करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि विस्तारक, कृषि क्षेत्रातील नवीन उद्योजक यांनाही पुरस्काराने या महोत्सवात सन्मानित केले जाणार आहे. असेही प्रकल्प संचालक निकम यांनी कळविले आहे.

पाणीपट्टी भरण्याचे आवाहन 
                                                                  
दिंडोरी तालुक्यातील पालखेड पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांतील दिंडोरी, निफाड, येवला, कोपरगाव व वैजापूर तालुक्यातील सर्व लाभधारक शेतकरी व बिगर सिंचन ग्राहकांनी पालखेड पाटबंधारे विभागाकडील मार्च 2023 अखेरची सिंचन, बिगरसिंचन पाणीपट्टीची थकबाकी तसेच वर्ष 2023-24 ची चालु आकारणीची पाणीपट्टी  संबंधित शाखा कार्यालयात 10 मार्च 2024 पर्यंत जमा करावी, असे आवहन कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक वैभव भागवत यांनी जाहीर केले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News Agriculture Department's Agricultural Festival from February 10 in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.