Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षांत 222 शेततळ्यांची निर्मिती

Agriculture News : शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षांत 222 शेततळ्यांची निर्मिती

latest news agriculture news 222 farm ponds created in Malegaon taluka in two years for fish or farming | Agriculture News : शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षांत 222 शेततळ्यांची निर्मिती

Agriculture News : शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षांत 222 शेततळ्यांची निर्मिती

Agriculture News : या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे.

Agriculture News : या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना (Krushi Sinchan Yojana) आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी परियोजना (पोकरा) या दोन योजनांमुळे मालेगाव तालुक्यात जलसाठ्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली आहे.

सन २०२२-२४ या कालावधीत तालुक्यात एकूण २२२ शेततळ्यांची  (Shettale Nirmiti) निर्मिती झाली असून, यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, तसेच पोकरा योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानाची तरतूद आहे. या अंतर्गत तालुक्यातील २०५ लाभार्थ्यांना एकूण १ कोटी २९ लाख ४५ हजारांचे म्हणजे प्रत्येकी एक लाख १७ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

शाश्वत सिंचनाची गरज :
शेततळ्यामुळे पावसाच्या अविश्वासार्हतेवर मात करता येते. मालेगाव तालुक्यातील १५ हजार हेक्टरवरील फळबागांचे संरक्षण, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बागायती पिकांची देखभाल आणि मत्स्यपालनातून अतिरिक्त किमान २ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. विशेषतः फळबाग, भाजीपाला आणि हंगामी पिकांसाठी शेततळे ही एक चांगली व व्यवहार्य संकल्पना आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, पाणी टिकवून ठेवल्यामुळे दुष्काळी स्थितीतही पीक वाचवता येते.

कामाची प्रक्रिया :
चार आकाराच्या शेततळ्यांच्या प्रकाराचा समावेश
डीबीटी पोर्टलद्वारे शेतकरी नोंदणी करतात.
लॉटरीद्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड होते.
विभागाच्या सह्याने पाहणी व ४ मार्गदर्शन
शेततळे खोदकाम व प्लॅस्टिक आस्तरीकरण
पाण्याचा शाश्वत साठा निर्माण झाल्यामुळे जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि मत्स्यपालनासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

ही संधी शेतीला स्थैर्य देणारी 
शेतकरी काळू बोरसे म्हणाले की, माझ्यासारखा कमी क्षेत्र असलेला पारंपरिक शेतकरी आज गावात यशस्वी डाळिंब बागायतदार म्हणून ओळखला जातो. हे फक्त शेततळ्यामुळे शक्य झाले. याचा मला अभिमान आहे. तर तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभघ्यावा. ही संधी शेतीला स्थैर्य, उत्पादनक्षमता देणारी आहे.
 

Web Title: latest news agriculture news 222 farm ponds created in Malegaon taluka in two years for fish or farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.