अकोला : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (PDKV) विविध पिकांचे १८१ वाण देशाला देऊन हरितक्रांतीसाठी मोलाचा हातभार लावला आहे. या कृषी विद्यापीठाचा रविवार, २० ऑक्टोबर रोजी ५६ वा स्थापना दिवस आहे. विद्यापीठाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी तंत्र विद्यालय तथा संशोधक आणि विस्तार विभागातील तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.
२० ऑक्टोबर १९६९ रोजी अकोल्यात या कृषी विद्यापीठाची (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) स्थापना झाली. गत ५५ वर्षांत या कृषी विद्यापीठाने विविध पिकांवर संशोधन करून १८१ नवे वाण विकसित केले आहेत. ५२ अवजारे व यंत्रे निर्मितीसह कालसंगत १,५७८ पीक तंत्रज्ञान तथा शिफारशी प्रसारित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध पीक वाणांचे, फळ पिकांचे तसेच यंत्र अवजारांचे सुमारे २१,५३५ कोटी रुपयांहूनही अधिक किमतीचे योगदान आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) हे महाराष्ट्र सरकारच्या ugc अधिनियमाद्वारे स्थापित महाराष्ट्राचे राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे १९६९ मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचे नामकरण विदर्भाचे सुपुत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावावर करण्यात आले. ते सरकारचे कृषी मंत्री होते. भारताचे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
पाण्याचा काटेकोर वापर
प्रामुख्याने कोरडवाहू शेती पद्धतीचा अवलंब होत असलेल्या विदर्भात जलयुक्त शिवार निर्मितीचे विविध उपचार पद्धतींसह उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी काटेकोर वापर करण्याकडे विद्यापीठाचा भर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तथा केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सहयोगातून ३० हून अधिक खोदतळे निर्माण होत १२७६ दशलक्ष घनफूट पाणी साठा विद्यापीठात उपलब्ध झाला असून याद्वारे सुमारे ६६३ हेक्टर क्षेत्राला संरक्षित ओलिताची सोय होत संशोधन कार्यासह बीजोत्पादनाला मदत होत आहे. २५ कृषी संशोधन एककांच्या माध्यमातून कार्यान्वित आहे.