Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर 

Latest News Agriculture News Crops on 38,000 hectares were destroyed in Nashik district within 13 hours, read in detail  | Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर 

Agriculture News : अवघ्या १३ तासांत जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ५५४.२० हेक्टरवरील पिके आडवी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Agriculture News : अवघ्या १३ तासांत जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ५५४.२० हेक्टरवरील पिके आडवी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : संपूर्ण जिल्हाभर शनिवारी (Nashik Rain) दुपारी तीन ते रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळेत ढगफुटीसदृश पाऊस झाला. अवघ्या १३ तासांत जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ५५४.२० हेक्टरवरील पिके आडवी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तब्बल ८०६ गावे बाधित झाली असून, ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना या एकाच दिवसाच्या अतिवृष्टीचा (Heavy Rain) फटका बसला. रविवारी सकाळपासूनच पंचनाम्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाठ यांनी दिली.

चांदवड , देवळा आणि कळवणसह त्र्यंबक, बागलाणमध्ये जोरदार पावसाने (Crop Damage) दाणादाण उडवली. मात्र, सर्वाधिक नुकसान चांदवड व येवला तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. सोंगणीला आलेला मका, तसेच कांदा आली आहे. रविवारी सायंकाळी नुकसानीचा प्राथमिक अंदाज समोर आला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सोंगणीला आलेला मका, तसेच कांदा पिके, कांदा रोपे हे मात्र शेतातच सडत असून, बळीराजा मात्र ऐन सणासुदीच्या काळात अडचणीत सापडला आहे. ज्या भागात ४० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तेथील शेतशिवारातील नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, जेथे यापेक्षा कमी पाऊस झाला तेथेही पिकांना बराच फटका बसला आहे. भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून, यात कोथिंबिर, टोमॅटोला झळ बसली.

पिकांचे नुकसान पाहिले असता कांदा पिकाचे 12,961 हेक्टर, मका पिकाची 11582 हेक्टर, भात पिकाचे 9 हजार 48 हेक्टर, भाजीपाला 2958 हेक्टर, द्राक्ष 624 हेक्टर, डाळिंब 408 हेक्टर सोयाबीन 326 हेक्टर तर टोमॅटो एक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

११ ते १६ पर्यंत ५५ हजार हेक्टरवर नुकसान 

शनिवारी एकाच दिवसात ३८,५५४.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जाहीर केला असला तरी त्या अगोदरच्या सहा दिवसात म्हणजे दि. ११ ते १६ ऑक्टोबर या सहा दिवसात त्याहूनही अधिक नुकसान झाले आहे. या सहा दिवसात तब्बल ५४ हजार ७६९ हेक्टरवरील पिके आडवी झाली असून, यात ९३ हजार ६२५ शेतकरी बाधित झाले आहेत. या सहा दिवसात मालेगाव व सटाणा तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.


चांदवड तालुक्यात द्राक्ष उत्पादक हवालदिल 
येवला, निफाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात शेतकयांनी द्राक्षबागांची लागवड केलेली आहे. या भागाला पावसाने झोडपले असून, नवीन फुलोरा गळून पडला. तर, जेथे छाटणी काढण्यासाठी रेलचेल सुरू होती तेथील द्राक्ष पिकाचेही नुकसान झाले. जिल्ह्यात ६२४.५५ हेक्टरवरील दाक्ष बागांचे शनिवारी एकाच दिवसात नुकसान झाले. त्यात सर्वाधिक फटका चांदवड तालुक्यातील द्राक्ष बागांना बसला. नुकसानीचा आकडा जरी ६२४.५५ हेक्टरचा असला तरी किमान दीड हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचा नुकसानीचा अंदाज आहे.

सर्वाधिक फटका मका पिकाला

जिल्ह्यात शनिवारच्या पावसाचा सर्वाधिक फटका मका पिकाला बसला असून, १२ हजार १९८ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदगाव, दिंडोरी, सुरगाना, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ इगतपुरी तालुक्यात मका सुरक्षित राहिला असून, सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात ४७८० हेक्टर इतके झाले आहे. त्या खालोखाल देवळा २८०४. चांदवड २४९३ हेक्टरवरील मका जमीनदोस्त झाला.

 

Web Title: Latest News Agriculture News Crops on 38,000 hectares were destroyed in Nashik district within 13 hours, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.