Join us

Grape Export Fraud : द्राक्ष एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली फसवणूक, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 14:43 IST

Grape Export Fraud : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सातत्याने द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सातत्याने द्राक्ष उत्पादकांच्या (Grape Export Fraud) फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. आता चांदवड तालुक्यातील आणखी एक प्रकरण समोर आले आहे. तालुक्यातील राहुड येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची १८ लाख ५९ हजार ६५४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची (Nashik Grape Farmer) फसवणूक काही नवीन नाही. यावर स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील कठोर पाऊले उचलत पथक निर्मिती केली आहे. तर द्राक्ष बागायतदार संघाकडून संबंधित शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच व्यापाऱ्यांशी देखील चर्चा केली जात आहे. मात्र याला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. कारण फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) राहुड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी विनायक कारभारी निकम यांच्याकडून पुणे येथील राहुल श्रीपती व इतर दोघे (सर्व रा. औद्योगिक वसाहत, महर्षीनगर, पुणे) यांनी तुमचा माल आम्हाला पसंत पडलेला आहे, आम्ही तुमचा माल परदेशात पाठवून त्याबदल्यात चांगले पैसे मिळवून देतो असे सांगितले. 

त्यानुसार दि.३० डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ७३ व ६२ रुपये प्रति किलो या दराने एकूण १८ लाख ५९ हजार ६५४ रुपयांची द्राक्षे खरेदी केली व आरटीजीएस करतो असे सांगून मालाचे पैसे दिले नाहीत. या प्रकरणी चांदवड पोलिस स्टेशनला विनायक कारभारी निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे, पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीधोकेबाजी