Agriculture News : कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकासाची वाटचाल कायम ठेवली आहे. कादवाला ऊस देण्यासाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देत आहे. ऊस तोडणीचे पूर्ण नियोजन करत कार्यक्षेत्रात 3771 गेट केन 3032 असे एकूण 6803 हेक्टर ऊसाची नोंद झालेली असून सुमारे चार ते साडे चार लाख मेंटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर (Dindori Sugar Factory) कारखान्याचा 48 व्या गळीत हंगाम गव्हाणपुजन समारंभ पार पडला. उपस्थितांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी श्रीराम शेटे म्हणाले की, कमी दिवसात जास्तीचे गाळप होणे अत्यावश्यक आहे. अजून एक हजार में टन गाळप क्षमता वाढविण्याचा विचार आहे. मात्र कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यास त्याबाबत पुढील हंगामात विचार केला जाईल. इथेनॉल प्रकल्पातून बी हेव्ही मोलॅसेसपासुन इथेनॉल निर्मिती पुर्ण क्षमतेने केली जाणार असल्याचे ते म्हणाले .
तसेच ते पुढे म्हणाले की, ऊस तोड मजूर संकट वाढू लागले आहे. त्यातच वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम एफ.आर.पीवर होत आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी ऊस तोड करून पोहचवण्याचा पर्यायावर विचार करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साखरेचे किमान मूल्य दर वाढणे गरजेचे आहे.
याबाबत साखर संघ केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहे, तरी साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचे किमान मूल्य वाढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढविण्याची गरज असून ऊस लागवड करत तो कादवालाच पुरवावा असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
हेही वाचा : आडसाली ऊस गाळपास प्राधान्य देत सोमेश्वर कारखाना करणार तेरा लाख टन गाळप