Agriculture News : राज्यात यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा (Pik Vima Yojana) योजनेत १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे आणखीन नुकसान झाले. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तब्बल ७६ लाख ३६ हजार ८६७ तक्रारी दाखल केल्या आहेत.
ऑक्टोबरमधील परतीच्या (October Rain) पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर (Crop Damage) नुकसान झाले. त्यामुळे खरीप पिक विमा काढलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे ७६ लाख ३६ हजार तक्रारी अर्थात दावे दाखल केले आहेत. या सर्वेक्षणाचे क्षेत्रीय पातळीवर सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत.
शेतकऱ्यांना या तक्रारी ऑनलाईन व ऑफलाईनही करता येतात. त्यात ७६ लाख २० हजार २४४ तक्री ऑनलाईन तर १६ हजार ६२३ तक्रारी ऑफलाईन आल्या आहेत. सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ तकारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत. त्या खालोखाल ८ लाख ९ हजार २३५ तक्री नांदेड जिल्ह्यातून आल्या आहेत. या पावसाचा सर्वात मोठा फटका, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, बाजरी या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
जिल्ह्यानुसार पिकविम्याच्या तक्रारी
अहिल्यानगर जिल्ह्यात ०२ लाख ६४ हजार ७७९, नाशिक जिल्ह्यात ७३ हजार ९०१, चंद्रपूर जिल्हा ८७ हजार ९३७, सोलापूर जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ७४, जळगाव जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ४२२, सातारा जिल्ह्यात २४६७, परभणी जिल्ह्यात ०७ लाख १५ हजार ३४९, वर्धा जिल्ह्यात एक लाख ८८ हजार २७०, नागपूर जिल्ह्यात ९१ हजार ६२३, जालना जिल्ह्यात ०४ लाख ३५ हजार ६७२, गोंदिया जिल्ह्यातील ३१७, कोल्हापूर ५९२६, ठाणे ३७, रत्नागिरी ४२, सिंधुदुर्ग ६१, नांदेड ८९३२५, संभाजीनगर ०७ लाख ८४ हजार ५९०, भंडारा १८६५६, पालघर २६७०, रायगड ६७७, वाशिम ०२ लाख ८० हजार ६४३....
बुलढाणा ०४ लाख ४५ हजार ११९, सांगली १५७२७, नंदुरबार २९ हजार ९४४, बीड १० लाख ८७ हजार ९४४, हिंगोली ४ लाख ९३ हजार ६००, अकोला ०२ लाख ६८ हजार ५०४, धुळे ६८ हजार ४१०, पुणे ६ हजार ३२२, धाराशिव ५५ हजार १६३, यवतमाळ ३ लाख ९० हजार ३१३, अमरावती ०१ लाख ९६५७, गडचिरोली ३४४४ तर लातूर ७४ हजार २८२ पीक विमा तक्रारी प्राप्त झाले आहेत.