Join us

wheat Variety : हेक्टरी 33 क्विंटलचे उत्पादन देणारे गव्हाचे नवीन वाण विकसित, काय आहेत वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 1:17 PM

Wheat Variety : गव्हाची पुसा गहू शरबती (HI 1665) ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरने विकसित केली आहे.

Wheat Variety : पीएम मोदींनी गेल्या रविवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी पिकांच्या 109 नवीन वाणांचे (Crop Variety) प्रकाशन केले. या 109 जातींपैकी दोन गव्हाच्या आहेत, त्यापैकी एका जातीचे नाव पुसा गहू शरबती (HI 1665) आहे. गव्हाची ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरने विकसित केली आहे. अर्थात, गव्हाची ही जात हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे, विशेषतः  पश्चिम आणि दक्षिण भारतात गव्हाच्या विस्तारासाठी हे वाण विकसित करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून पिकांच्या 109 जाती जाहीर केल्या, यात दोन जाती या गव्हाच्या आहेत. यात पुसा शरबती गव्हाची हि जात असून  जी 110 दिवसांत पिकते, तसेच प्रति हेक्टर 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते. विशेष म्हणजे याला जास्त सिंचनाची गरज नसून, ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. पुसा गहू शरबती (HI 1665) जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चांगले दाणे. या दाण्यांमध्ये झिंकचे प्रमाण 40.0 पीपीएम पर्यंत असते, शिवाय ही बायोफोर्टिफाइड जात आहे.विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मैदानी भागात लागवडीसाठी विकसित केली आहे. 

गव्हाची लागवड वाढली... 

आहार संतुलनासाठी स्थानिक लोकांमध्ये रोटी-परांठ्यांची मागणी वाढली असून, त्यामुळे गव्हाची मागणी वाढली असून, शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व भारतातही अशीच परिस्थिती आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी गव्हाखालील क्षेत्रात वाढ होऊन हे क्षेत्र 34 दशलक्ष हेक्टरवर पोहोचले. अशा परिस्थितीत, पुसा गव्हाची शरबती (HI 1665) ही जात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये गव्हाच्या विस्ताराची योजना म्हणून पाहिली जाऊ शकते.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

या वाणाच्या उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही जात ३३.० क्विंटल/हेक्टरपर्यंत (मर्यादित सिंचन परिस्थितीत) उत्पन्न देऊ शकते. पण संभाव्य धान्य उत्पादन ४३.५ क्विंटल/हेक्टर इतके आहे. तसेच गव्हाची ही जात 110-115 दिवसांत तयार होईल. तसेच, या जातीच्या गव्हाची उंची 85-90 सेमी असून 1000 दाण्यांचे वजन 44 ग्रॅम असल्याचे आढळून आले आहे. काळा आणि भुरा तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :गहूशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेतीइंदौर