Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद 

Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद 

Latest News Agriculture News Loom factories malegaon in Nashik district closed for eight days | Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद 

Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद 

Agriculture News : कापडाच्या किमतीत झालेली घसरण, सुताच्या दरातील चढ-उतारामुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे.

Agriculture News : कापडाच्या किमतीत झालेली घसरण, सुताच्या दरातील चढ-उतारामुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : पावसाळी अधिवेशनात सरकारकडून कापड उद्योगासाठी कल्याणकारी निर्णय न घेतल्याने तसेच विविध अडचणीमुळे उद्योगाला मोठा फटका बसत आहे.

दिवसागणित कापडाच्या किमतीत झालेली घसरण, सुताच्या दरातील चढ-उतार व महागड्या दराच्या विजेमुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे पॉलिस्टर कारखाने शनिवार दि.१० ते १६ ऑगस्टपर्यंत तर कॉटन मिक्स कारखाने १४ ते १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मालेगावी आठ दिवस पॉवरलूम कारखान्याची खटखट बंद राहणार आहे. 

मालेगाव शहरातील जाफरनगर व हकीम जमात खाना येथे पॉलिस्टर व कॉटन मिक्स यंत्रमाग कारखानदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कापड व्यवसाय हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असताना शासनाकडून उद्योग वाढीसाठी किंवा कामगारांच्या कल्याणासाठी कोणताही निर्णय न घेतल्याने व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सुताच्या दरात होणारी नियमित वाढ, मागणी नसल्याने दरात घसरण यामुळे व्यापारी अडचणीत आले आहे. पडून असलेल्या कापडाचा उठाव होत नाही तोपर्यंत किमान आठवडाभर पॉलिस्टर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहेत. 

भारतात बांग्लादेश व चीन या देशांमधून कापड आयात होत आहे. सरकारने ही आयात थांबवून कापडाची निर्यात खुली करणे गरजेचे आहे. पॉलिस्टरसाठी १३० रुपये किलोप्रमाणे कच्चा माल घ्यावा लागतो. मागणी झळ सोसून कापड विक्रीची वेळ आली आहे.

- उमेर अन्सारी, पॉलिस्टर कारखानदार

दिवसाला ८५ लाख मीटर उत्पादन
शहरात पॉलिस्टरचे ३० तर कॉटन मिक्स कापड निर्मितीचे २० टक्के यंत्रमाग आहेत.
दिवसभरात पॉलिस्टर कापडाचे ५० लाख मीटरचे उत्पादन होते. तर कॉटन मिक्कर
३५ लाख मीटर कापड तयार होते. आजमितीस करोडो मीटर
कापड कारखान्यांमध्ये पडून आहेत. पीसी यार्न प्रतिकिलो २० २२०, कॉटन यार्न १९७० ते १९८० प्रती पाच किलो, रोटो यार्न १२६ ते १३० रुपये किलोचे दर आहे.

Web Title: Latest News Agriculture News Loom factories malegaon in Nashik district closed for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.