Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Latest News Agriculture News Malegaon KVK's five-day beekeeping training is completed | Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Agriculture News : ग्रामीण युवकांसाठी पाच दिवसीय 'शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Agriculture News : ग्रामीण युवकांसाठी पाच दिवसीय 'शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : ग्रामीण युवकांसाठी पाच दिवसीय 'शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' (Bee Keeping) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव यांच्यामार्फत सटाणा जवळील साल्हेर जवळ घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी सटाणा तालुक्यातील साल्हेर गावाच्या पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामीण  युवक प्रशिक्षणासाठी सहभागी  झाले होते. 

या प्रशिक्षणात मधमाशी पालनाचा (Honey Bee) इतिहास, मधमाशांची ओळख, मधमाशांचे प्रकार, मधमाशांचे कुटुंब, मधपेटीची हाताळणी, मध काढणी, मधमाशीसाठी हानिकारक कीडनाशके तसेच मधमाशी संवर्धनाविषयी जणजागृती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण युवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मालेगाव केव्हीकेचे विशाल चौधरी यांनी मधमाशी संवर्धन करून आपण स्वतः रोजगार मिळवू शकतो, सोबत मध काढून त्यापासून आपण जास्तीचे शेतीला पूरक असे उत्पन्न घेऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

त्यासोबत प्राशिक्षणार्थीनी स्वतः मधमाशी पेटीची हाताळणी आणि पेटीच्या स्वच्छतेंचे धडे घेतले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदशक म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तथा प्रमुख शास्त्रज्ञ अमित एस. पाटील, पिक संरक्षण शास्त्रज्ञ विशाल जी. चौधरी, पशू विभागाचे शास्त्रज्ञ संदीप नेरकर, आत्माचे अधिकारी प्रितेश भामरे, कृषि सहायक, युवक व शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .

Web Title: Latest News Agriculture News Malegaon KVK's five-day beekeeping training is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.