Agriculture News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) कृषि विज्ञान केंद्राअंतर्गत राबवला जाणारा 'यश मधमाशी विकास' प्रकल्प शेतकरी, महिला, आदिवासी व शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे.
मधमाशा पर्यावरणाच्या समतोलासाठी (Environment Balance) आणि अन्नसुरक्षतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. तरीसुद्धा, त्यांच्या योगदानाबाबत अनेकांना फारसे ज्ञान नसते. मधमाशांच्या अधिवासाचा नाश, कीटकनाशकांचा अतिरेक, एक पिक पद्धत, हवामान बदल, आणि विविध आजारांमुळे मधमाशांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. ज्याचा थेट परिणाम अन्नसाखळी आणि निसर्गावर होत आहे.
या बाबी लक्षात घेऊन 'यश मधमाशी विकास' (Yash Honey Bess Project) प्रकल्पाने शहरी व ग्रामीण भागात मधमाशाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी 'मधमाशी साक्षरता' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना पाळीव व जंगली मधमाशांच्या महत्वाबद्दल माहिती देणे, पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करणे आणि मधमाशांचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांना चालना देणे आहे. त्याचबरोबर आधुनिक व वैज्ञानिक मधमाशी पालनाबाबत शेतकरी व विद्यार्थ्यांना सखोल माहिती व प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य संपन्न करणे हा आहे.
प्रकल्पाची उद्दिष्टे :
शास्रीय माहितीचा प्रसार -
मधमाशी पालनाचे महत्व, प्रक्रिय व तंत्रज्ञान याबाबत अद्यावत व शासशुद्ध माहिती शेतकरी व विद्यार्धापर्यंत पोहचवणे त्याचबरोबर जंगली व पाळीव मधमाशांच्या संवर्धना विषयी जनजागृती निर्माण करणे.
कौशल्य विकास -
मधमाशी पालनाचे तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन शेतकर्यांना व विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे,
आधिक विकासाला चालना -
मध, मेण व इतर मधमाशीजन्य उत्पादनांमधून उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे.
पर्यावरण संवर्धन -
जंगली व पाळीव मधमाशांच्या संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करून पर्यावरणाचे संरक्षण करणे,
प्रकल्पाचे मुख्य घटक :
प्रशिक्षण कार्यक्रम -
शेतकरी व विद्याव्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहे.
मधमाशांचे संगोपन आणि संवर्धन, जलद परागीभवनासाठी पाळीव मधमाश्यांचा वापर त्याचबरोबर मध उत्पादन व विपणन याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाते.
मधमाशी पालनासाठी साहित्य -
प्रशिक्षणार्थीना मधमाशांच्या वसाहती, संरक्षणात्मक साहित्य, आणि अन्य आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.
शास्त्रीय पद्धतीचा अवलंब -
शास्वज्ञ आणि तज्ञांच्या मदतीने मधमाशी पालनाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
भविष्यातील योजना -
ग्रामीण व शहरी भागात मधमाशी साक्षरता अभियान राबविणे यामाध्यमातून जंगली व पाळीव मधमाशांचे महत्व लोकांना पटवून देणे.
राष्ट्रीय मध योजना' या मार्फत शेतकरी, महिला, भूमिहीन तसेच विद्यार्थी वगांमध्ये मधमाशी पालनाचे कौशल्य निर्माण करून स्वयंरोजगार निर्माण करणे हा आहे.
प्रकल्पाचे महत्व :
विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने 'यश मधमाशी विकास' प्रकल्प शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा व विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक विकासच नव्हे तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही महत्वपूर्ण ठरतो आहे.
"मधमाशा या आपल्या शेतीसाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. परागीकरणामुळे पिकांचे दर्जेदार व भरगोस पिक उत्पादन प्राप्त होत आहे. 'यश मधमाशी विकास' प्रकल्पाच्या वतीने आपणास विनंती आहे की, मधमाशा पालनाचा अवलंब करा आणि त्यांच्या संरक्षणासाठी योगदान द्या. आपल्या सहकार्यामुळे व सहभागामुळे निसर्गाचा समतोल राखता येईल."
- डॉ. नितीन जयसिंग ठोके, (वरिष्ठ शास्वज्ञ व प्रमुख) 'यश मधमाशी विकास' प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, नाशिक