Join us

PM Kisan Yojana : 'या' तारखेला मिळणार पीएम किसानचा 18 वा हफ्ता, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 7:45 PM

PM Kisan 18th Installment 2024 :

मुंबई : देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. होय, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. (PM kisan Yojana 18th Installment Date) पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार, 18 व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी (PM Kisan 18th Installment 2024) योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतात. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 3 हप्ते येतात. तर यापूर्वी या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांसाठी जारी केला होता. सदर हप्ता DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. त्यानंतर आता १८ हफ्ता ५ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे. 

दरम्यान पीएम किसान 18 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करणे खूप महत्वाचे आहे. जर कोणत्याही लाभार्थीची ई-केवायसी प्रक्रिया झाली नसेल, तर तो पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही आणि तो योजनेच्या लाभांपासून वंचित राहील. या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. 

अशी करा ई केवायसी 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी कसे करावे हे जाणून घेण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा : 

  • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि eKYC चा पर्याय निवडा.
  • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि शोध पर्यायावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

किंवा 

  • OTP-आधारित e-KYC: मोबाईल नंबरवर पाठवलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) वापरून ओळख सत्यापित करा.
  • CSC केंद्रावर बायोमेट्रिक ई-केवायसी : जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन केवायसी करता येईल. 
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी