Join us

Agriculture News : देशभरात कोणत्या पिकाची किती लागवड? कुठल्या पिकाची सर्वाधिक लागवड? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 9:19 PM

Agriculture News : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

Agriculture News : गेल्या वर्षी याच कालावधीत 378.4 लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झाली होती, यंदा 394.28 लाख हेक्‍टर क्षेत्रात भाताची लागवड झाली आहे. तर मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत 115.55 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड झाली होती, यंदा 122.16 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद झाली आहे.  तसेच मागच्या खरीप हंगामात याच कालावधीतील 177.50 लाख हेक्टरमध्‍ये भरड धान्याची लागवड झाली होती; यंदा आत्तापर्यंत 185.51 क्षेत्रात भरड धान्‍याची लागवड झाली आहे. मागच्या खरीप हंगामात याच कालावधीतील 187.36 लाख हेक्टरमध्‍ये तेलबियांची लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 188.37 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद झाली आहे. 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत आजपर्यंत, म्हणजे - 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर मध्ये

 

अनु क्रम

पिकाचे नाव

       पेरणी  क्षेत्र

       पेरणी  क्षेत्र

 

             

 

2024         

2023            

 

1

भात

394.28

378.04

2

डाळी

122.16

115.55

a

तूरडाळ

45.78

40.74

b

उडीद

29.04

30.81

c

मूग

34.07

30.57

d

कुळीथ

0.24

0.26

e

मटकी

9.12

9.37

f

इतर डाळी

3.91

3.80

3

श्रीअन्न आणि भरड धान्ये

185.51

177.50

a

ज्वारी

14.93

13.84

b

बाजरी

68.85

70.00

c

नाचणी

9.17

7.63

d

लहान/बारिक तृणधान्य

5.34

4.78

e

मका

87.23

81.25

4

तेलबिया

188.37

187.36

a

भुईमूग

46.82

43.14

b

सोयाबीन

125.11

123.85

c

सूर्यफूल

0.71

0.68

d

तिळ

10.67

11.58

e

कारळे

0.31

0.36

f

एरंडेल

4.70

7.71

g

इतर तेलबिया

0.04

0.05

5

ऊस

57.68

57.11

6

ताग आणि मेस्टा

5.70

6.56

7

कापूस

111.39

122.74

एकूण

1065.08

1044.85

 

 

टॅग्स :खरीपशेती क्षेत्रशेतीभात