Agriculture News : आदिवासी बांधव उन्हाळ्यात (Summer Season) आणखी एक काम करतात ते म्हणजे सरपण गोळा करण्याचे. म्हणजे लाकूड फाटा जमा करण्याचे. हे काम गाव परिसरात , आजूबाजूच्या शिवारात केले जाते. पुढे येणाऱ्या पावसाळ्यासाठी जळणासाठी लाकडं गोळा केली जातात. घरात ती रचून ठेवली जातात. हे लाकडं गोळा (Sarpan Gola Karne) करण्याचे काम नेमकं कसे केले जाते, ते पाहुयात....
एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून घरोघरी उज्वला योजनेच्या (Ujwala Yojana) माध्यमातून गॅस प्रदान करण्यात आले. मात्र नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे ही योजना राबविण्यात आली. आज अनेक घरात गॅस आले असले तरीही ग्रामीण भागात लाकूड फाटा गोळा करणे आवश्यकच ठरते. कारण गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder Rate) सर्वसामान्यांचे आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवाना पुन्हा एकदा चुलीकडे मोर्चा वळवावा लागला आहे.
म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत सरपण गोळा करण्याचे काम केले जाते. चुलीमध्ये जी लाकडे घातली जातात, त्याला फाटा असे म्हणतात. लाकूड-फाटा असा शब्द जास्त प्रचलित आहे. यास सरपण असेही म्हणतात. तर ही लाकडं गोळा करण्यासाठी पहाटेच बाहेर पडावे लागते, जेणेकरून उन्हाच्या आधी सरपण गोळा करता येईल. अशावेळी झाडाच्या फांद्या, काट्या कुट्याची झाडे पाहून तोडली जातात.
ही झाडे तोडल्यानंतर डोक्यावर मोळी रचून किंवा जास्तीची लाकडं आणि जाड असल्यास बैलगाडीच्या साहाय्याने आणली जातात. कधी कधी दोन-तीन लोक मिळून लाकडं आणण्यासाठी गेले असतील तर ट्रॅक्टरची तजवीज केली जाते. अशा रीतीने लाकडं घरी आणल्यानंतर घराच्या बाजूला जिथे पावसापासून सुरक्षित राहतील अशा ठिकाणी अगदी छान पद्धतीने रचून ठेवली जातात. हीच लाकडे पुढे पावसाळ्यात वापरली जातात. अशा पद्धतीने उन्हाळ्यात लाकडे गोळा करणे हे काम देखील ग्रामीण भागात सर्रास केले जाते.
Agriculture News : राब भाजणी म्हणजे काय? आदिवासी बांधव भात, नागलीसाठी भुजणी कशी करतात?