Join us

Agro Climatic Zones Of India : भारतातील कृषी हवामान क्षेत्र कोणते, शेतीवर कसा प्रभाव पडतो? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:25 PM

Agro Climatic Zones Of India : शेती म्हटली की परिसरातील वातावरणाचा (Climatic Zones) चांगलाच प्रभाव पडतो. मग पोषक वातावरण असल्यास चांगले उत्पादनही मिळते.

Agro Climatic Zones Of India : शेती (Farming) म्हटली की परिसरातील वातावरणाचा चांगलाच प्रभाव पडतो. मग पोषक वातावरण असल्यास चांगले उत्पादनही मिळते. आपल्या देशात वेगवगेळ्या प्रदेशानुसार शेती केली जाते. तेथील कृषी हवामान क्षेत्र त्यावर परिणामकारक ठरत असते. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) 15 कृषी-हवामान क्षेत्र नमूद केले आहेत. ते कोणकोणते हे या लेखातून समजून घेऊया... 

भारतातील कृषी-हवामान क्षेत्र (ACZ) हे हवामान परिस्थिती आणि कृषी क्षमता असलेले प्रदेश म्हणून ओळखले जातात. तेथील तापमान, पर्जन्यमान, मातीचा प्रकार आणि पीक योग्यता यावर आधारित हे झोन मर्यादित आहेत. भारतात, भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) 15 कृषी-हवामान क्षेत्र ठरवलेले आहेत. 

हे झोन देशभर पसरलेले आहेत आणि विशिष्ट हवामान (climate) आणि मातीच्या वेगवगेळ्या परिस्थितीमुळे येथील प्रदेशाच्या कृषी पद्धती आणि उत्पादकतेवर परिणाम होतो. ICAR ने शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि प्रत्येक झोनमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्थान-विशिष्ट तंत्रज्ञान आणि हस्तक्षेप विकसित केले आहेत.

कृषी-हवामान क्षेत्र कोणकोणते? 

  1. पश्चिम हिमालयीन प्रदेश
  2. पूर्व हिमालयीन प्रदेश
  3. खालचा गंगेचा मैदानी प्रदेश
  4. मध्य गंगेच्या मैदानी प्रदेश
  5. उच्च गंगेच्या मैदानी प्रदेश
  6. ट्रान्स-गंगेटिक मैदानी प्रदेश
  7. पूर्व पठार आणि टेकड्यांचा प्रदेश
  8. मध्य पठार आणि टेकड्या
  9. पश्चिम पठार आणि टेकड्या
  10. दक्षिणेकडील पठार आणि टेकड्या
  11. पूर्व किनारपट्टी मैदाने आणि टेकड्या
  12. पश्चिम किनारपट्टी मैदाने आणि घाट क्षेत्र
  13. गुजरात मैदाने
  14. पश्चिम कोरडा प्रदेश
  15. बेटे प्रदेश

 

हेही वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात कशी राहणार थंडी? हवामानतज्ज्ञ काय सांगतात अंदाज

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीहवामानभारत