Agriculture News : विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी शेत जमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी (Rain Water) एकत्रित करून विहिरीजवळ आणता येते. या पाण्याचा वापर विहीर पुनर्भरणासाठी केला जातो. तसेच, ओढ्याचे किंवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ करून कूपनलिकेत सोडले जाते.
अशी घ्या काळजी
- ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.
- विहिरीत पाणी तळापर्यंत पाईपव्दारे पोहचवावे.
- पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.
- पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.
- पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.
- ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरु नये.
- औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरु नये.
- साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरु नये.
- कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक