Join us

Agriculture News : 2 रूपयात शेतातील गाजर गवत नष्ट करा, झायगोग्रामा भुंगे विक्रीसाठी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 6:53 PM

Agriculture News : गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Agriculture News : गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या माध्यमातून हे काम मागील ब-याच वर्षापासून सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांचाही सदर भुंगे खरेदीस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही भुंगे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  

दरवर्षीं प्रमाणे यंदाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून हा उपक्रम ठेवण्यात आला आहे. कारण शेतकऱ्यांना गाजर गवताच्या नियंत्रणासाठी भुंगे प्रभावी माध्यम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गाजर गवतावर उपजीविका करून गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे सध्या विद्यापीठातील परोपजिवी कीटक संशोधन योजना,कीटकशास्त्र विभागात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी प्रती भुंगा रु. २ प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर प्रती एकरी २०० व प्रती हेक्टरी ५०० या प्रमाणात भुंगे सोडावेत, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान ज्या शेतकऱ्यांना भुंगे खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा  कृषि विद्यापीठ परभणी येथील परोपजिवी कीटक संशोधन योजना कीटकशास्त्र विभागातील अधिकारी जी.एस.खरात आणि डॉ.एस.एस.धुरगुडे यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. 

सर्वात प्रभावी माध्यम... 

आपल्या देशात या गवतावर उपजिवीका करणा-या निरनिराळया २२ किडीची नोंद झालेली असली तरीही पाने खाणारा झायगोग्रामा भूंगा (झायगोग्रामा बायकोलोरॅटा) हे सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे. त्या अनुषंगाने गाजर गवताच्या नियंत्रणासाठी या भूंग्याचे प्रयोगशाळेत मोठया प्रमाणावर गुणन करुन नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याचे काम मागील ब-याच वर्षापासून सुरु आहे. मराठवाड्यासोबतच विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या प्रमाणात या भुग्यांसाठी मागणी करतात. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठातून घेऊन आपल्या भागात सोडलेले भुंगे सध्या बऱ्याच भागात स्थिरावलेले दिसतात, अशी माहिती डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी दिली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपरभणीशेतकरी