Agriculture News : रेशीम उद्योग हा कृषि व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन (Sericulture Farming) करण्यास राज्यात भरपूर वाव आहे.
राज्यातील रेशीम शेतीचे (Sericulture Farming) महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२५ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. ९ जानेवारी २०२५ पासून ते दि.९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या कालावधीत राज्यात "महारेशीम अभियान-२०२५ राबविण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
1. महारेशीम अभियान-२०२५ राबविण्यासाठी संदर्भाधीन दि.१२ डिसेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या समित्या, अभियान राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना व कार्यपध्दती जशास तशा लागू राहतील.
2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा आपले सरकार पोर्टलवर जनतेकरिता उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यास अभियान कालावधीत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी व जनजागृती करण्यात यावी. तसेच, नवीन शेतकरी/ उद्योजक नोंदणी आपले सरकार पोर्टलवर करण्याबाबत सर्व संबधित क्षेत्रिय कार्यालयास अवगत करण्यात यावे.
3. राज्यात ग्रामपंचायत /स्थानिकस्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूका असल्यास महारेशीम अभियान-२०२५ राबविताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता क्षेत्रीय अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांनी घ्यावी.
4. सदर महारेशीम अभियानाकरिता आवश्यक निधी विविध मंजूर योजनामधील प्रशिक्षण, मेळावे, प्रचार व प्रसिध्दी या बाबींकरिता उपलब्ध असलेल्या निधीतून विहीत मर्यादेच्या व वित्तीय अधिकार नियमाच्या अधिन राहून खर्च करण्याची जबाबदारी संचालक (रेशीम) यांची राहील.
Kanda Market Update : लासलगाव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव