Join us

Krushi Yantrikkaran Yojana : कृषी यांत्रिकरणा योजनेसाठी 75 कोटींच्या निधीस मंजुरी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:14 IST

Krushi Yantrikkaran Yojana : राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikkaran Yojana) राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Krushi Yantrikkaran Yojana : राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना (Krushi Yantrikkaran Yojana) राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी ही महा-डीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते.

या योजनेसाठी सन २०२४-२५ या वर्षात २५०.०० कोटी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये १५०.०० कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तर २७.७५ कोटी इतका निधी वितरीत केला आहे. सन २०२४-२५ या वर्षात योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्व व नवीन लॉटरी (Maha DBT Portal) काढण्याच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चासाठी आता ७५.०० कोटी इतका निधीस मान्यता देण्यात आली आहे. 

  • सदर शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी दिनांक ३१ मार्च, २०२५ पर्यंत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी.
  • सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५०% किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ४०% किंवा रु.१ लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात यावे.
  • इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे.
  • सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध करुन देण्यात येंत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरीत होईल याची दक्षता घेण्यात यावी. 
  • या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची सोडत MAHADBT पोर्टलवरुन विहीत कार्य पध्दतीचा अवलंब करुन काढण्यात यावी. तसेच, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महा-डीबीटी प्रणालीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करावी.

 

अधिकाऱ्यांना सूचना सदर निधी खर्च करताना तो विहित कार्यपद्धती अनुसरून सर्व वित्तीय कायदे नियम परिपत्रक अधिकाऱ्यांच्या मर्यादेत तरतुदीनुसार बजेट कोषागार नियमांवरून नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणांनी करावी, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही नियम अधिकाराचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची राहील सदर निधीचे आहरण कोषागारातून करण्यात यावे आणि बँक खात्यात अखर्चित निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेती