Maharashtra Kaju Mandal : महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या (Maharashtra State Cashew Board) भागभांडवलासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित ५० कोटी रुपये निधीपैकी १ कोटी ६० लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये ५० कोटी अर्थसंकल्पित निधी असून चालू वर्षी वितरीत निधी २.४० कोटी रुपये आणि आता वितरीत करावयाचा निधी १.६० कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे.
कृषी व पदुम विभागाने महाराष्ट्रातील (Agriculture Dep) काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळ पिक विकास योजना लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यास अनुसरुन राज्यातील काजू फळ पिकाच्या विकासाकरिता "महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर काजू मंडळ हे काजूच्या Promotional, Processing, Value addition व Marketing या क्षेत्रात काम करणार आहे.
महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या भागभांडवलासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित ५० कोटी रुपये निधीपैकी यापूर्वी २.४० कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. आता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता अर्थसंकल्पित निधीपैकी १.६० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता १.६० कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शासन निर्णयात महत्वाचे आवाहन
सदरहू खर्च काजू फळपिक विकास योजना, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यातील गुंतवणूका" या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करीता मंजूर असलेल्या अर्थसंकल्पीय निधीतून भागविण्यात यावा. तसेच महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी RTGS सुविधेद्वारे महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या बँक खात्यावर जमा करावयाचा आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सदर निधी ज्या कारणास्तव मंजूर केलेला आहे, त्याच कारणासाठी विनियोग करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी दक्षता घ्यावी.असेही नमूद करण्यात आले आहे.