Join us

Bamboo Workshop : बांबू शेतीची संपूर्ण माहिती मिळणार, सटाणा येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 2:20 PM

Bamboo Workshop : या कार्यशाळेत बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासह लाभार्थ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी बांबू रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

Bamboo Workshop : आत्मनिर्भर कृषी अभियान अंतर्गत ब्रह्मगिरी कृषी सेवा सहकारी संस्था, आरंभ खोरे गौकेंद्रित प्रोड्युसर कंपनी सटाणा यांचा संयुक्त विद्यमाने बांबू लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासह लाभार्थ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी बांबू रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शास्वत शेतीसाठी अटल बांबू समृद्धी योजना कार्यान्वित आहे हळूहळू बांबू शेतीकडे शेतकरी आकर्षित होत आहे. या पार्श्वभूमीवर बांबू लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी सटाणा शहरात या कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पाशा पटेल हे उपस्थित असणार आहेत.

या कार्यशाळेतून लाभार्थ्यांना बांबूची रोपे मोफत वाटप केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर, वन हक्क जमिनीवर ही बांबू लागवड करता येणार आहे. शिवाय या बांबू लागवडीसाठी मदत देखील केली जाणार आहे. तसेच नदी नाल्यात धरणाला लागवडी केल्यास जमिनीची धूप देखील थांबवण्यास मदत होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बांबू लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.