Join us

Banana Farming : जळगावची केळी चंद्रपुरात बहरली, सहा मित्रांचा पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 5:03 PM

Banana Farming : सहा सहकारी शेतकरी मित्रांनी केळी पिकाला पसंती देत पारंपरिक पिकांसोबत दर्जेदार केळीच्या पिकाची लागवड केली आहे. 

Banana Farming : शासकीय योजनांचा फायदा आणि नव तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेतीतून सोनं कसं पिकवता येते, हे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील (Chandrapur) बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील नरेंद्र आमने व त्यांच्या सहा सहकारी शेतकरी मित्रांनी केळी पिकाला प्रथम पसंती देत क्रांतिकारक पाऊल उचलत पारंपरिक पिकांसोबत दर्जेदार केळीच्या पिकाची लागवड केली आहे. 

नरेंद्र आमने यांनी आपल्या दहा मित्रांना केळीचे उत्पन्न (Banana Farming) घेण्याची कल्पना दिली व यासाठी जळगाव येथे जावून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी तिथे कशा पद्धतीने लागवड करायची, निगा कशी राखायची, याची पाहणी केली व प्रशिक्षण घेतले. तेथील काही शेतकऱ्यांचे सहकार्य घेऊन सहा एकर शेतात पारंपरिक पीक कापूस, सोयाबीन, तूर यासोबत दोन एकरमध्ये "टिशुकल्चर केळीचे वान" असलेल्या रोपांची लागवड केली. 

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे या मित्रांनी जळगाव गाठत केळी शेतीबाबत बारीक सारीक माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारावरच या सहा मित्रांनी सुद्धा आपापल्या एक एकर शेतात केळीची लागवड केली. योग्य निगा व त्या प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शनाने पीक जोमाने वाढत आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन त्यांना मिळणार आहे. पारंपरिक पिकांसोबत गावच्या शिवारात केळीच्या बागा बहरल्या आहेत. 

पारंपरिक पीक कापूस, सोयाबीन (Soyabean), तूर, भात हे पीक सगळेच शेतकरी घेत असतात. परंतु आपल्या विदर्भात कच्या केळीपासून बनवलेले चिप्स, पिकलेल्या केळीची बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे येथेच ते मिळाल्यास मोठी बाजारपेठ मिळणार. शिवाय त्या खाजगी कंपनीने केळी विकत घ्यायची तयारी दर्शविल्याने मी व माझ्या मित्रांनी पारंपरिक पिकासोबत केळीची लागवड केली आहे. - नरेंद्र आमने, युवा शेतकरी नांदगाव (पोडे)

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीचंद्रपूरकेळी